India-China Clash: अभिनेता विक्की कौशल याने भारतीय जवानांना वाहली श्रद्धांजली; ट्वीटरवर युजर्सने केल्या 'अशा' भन्नाट कमेंट
अजूनही चार जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत.
सोमवारी रात्री पूर्व लडाखच्या गलवाण खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. अजूनही चार जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, आणि सर्वसामान्यांनी भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहली आहे. दरम्यान, अभिनेता विक्की कौशल यानेही (Vicky Kaushal) ट्विटरच्या माध्यमातून भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहली आहे. परंतु, विक्की कौशलने ट्विट केल्यानंतर युजर्स कमेंटमध्ये उरी द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटामधील फोटो, क्लिप आणि संवाद कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला सुरुवात केली आहे. यामुळे विक्की कौशलच ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
लखाडच्या गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षामुळे संपूर्ण भारत पेटून उठला आहे. चीनच्या कुरापतींवर देशात ठिकठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे. अभिनेता विक्की कौशल यानेही ट्वीटरच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे. "गलवान खोऱ्यात शूरपणे लढलेल्या आणि आपल्या राष्ट्राच्या गौरवासाठी स्वत: शहीद झालेल्या आमच्या वीरांना मी सलाम करतो. त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून सांत्वन करतो. जय हिंद", असे ट्विट विक्की कौशलने केले आहे. त्यानंतर कंमेट बॉक्समध्ये उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटांमधील फोटो आणि व्हिडिओ क्लिपचा वर्षाव होऊ लागला आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आईचे सलमान खान वर गंभीर आरोप; पहा व्हिडिओ
विक्की कौशलचे ट्वीट-
चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. येत्या 19 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली. भारतातील विविध पक्षाचे अध्यक्ष या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष बैठकीत सहभागी होतील. पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करुन याविषयी माहिती दिली.