अभिनेता सोनू सूदने बर्थ डे दिवशी 3 लाख नोकरींची केली घोषणा; Amazon, Sodexo सह बड्या कंपन्यांसोबत करार
दरम्यान यामुळे अनेकांना नोकरीच्या संधीची माहिती मिळेल. कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारांना हाताला काम मिळेल.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आज (30 जुलै) 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज त्याने वाढदिवसानिमित्त चाहत्यांसह अनेकांसाठी एक मोठं सरप्राईज दिलं आहे. आज बर्थ डे च्या निमित्ताने सोनूने 3 लाख नोकर्यांची घोषणा केली आहे. यासाठी सोनू सुदने अमेझॉन, सेडेक्सो सारख्या बड्या कंपन्यांसोबत हातमिळवणी केली आहे. आता काही बड्या कंपनींमध्ये नोकरीची संधी आणि कामगार यांच्यामध्ये अभिनेता सोनू सुद दुवा बनणार आहे. दरम्यान यामुळे अनेकांना नोकरीच्या संधीची माहिती मिळेल. कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारांना हाताला काम मिळेल.
सोनू सुदने ट्वीट करत याची माहिती देताना, ' आज माझ्या बर्थ डे दिवशी स्थलांतरित मजुरांसाठी PravasiRojgar.com चा 3 लाख नोकर्यांसाठी करार झाला आहे. यामध्ये उतम वेतन,PF,ESI सोबतच अन्य लाभदेखील दिले जातील. AEPC, CITI, Trident, Quess Corp, Amazon, Sodexo, Urban Co , Portea सह अन्य कंपन्यांचे आभार!
सोनू सुदचं ट्वीट
लॉकडाऊनच्या काळात मुंबईमध्ये सोनू सुदने अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्याची काही हॉटेल्स मुंबई पोलिसांसाठी उपलब्ध करून दिली तर काही ठिकाणी गोर गरिबांना मोफत अन्नधान्य दिलं. तर राज्यात अडकून पडलेल्या अनेक मजुरांना घरी पोहचवण्यासाठी मोफत बस सेवा खुली केली. श्रमिक स्पेशल मध्ये व्यवस्था करू दिली. यामुळे त्याच्यावर समाजातील अनेक स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
काही दिवसांपूर्वीच सोनू सुदने 'कपिल शर्मा सहो' मध्ये हजेरी लावली होती. त्याचा एक प्रोमो जारी करण्यात आला आहे. दरम्यान एका स्थलांतरित मजुराची कहाणी ऐकताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचेही पहायला मिळाले आहे.