Sohail Khan Divorce: खान कुटुंबात आणखी एक घटस्फोट; सोहेल खान आणि सीमा खान लग्नाच्या 24 वर्षांनंतर होणार वेगळे

सोहेल खान आणि सीमा खान यांनी 1998 मध्ये सात फेरे घेतले होते. सोहेल आणि सीमा यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून सीमा सोहेलपासून वेगळी राहत असल्याच्या बातम्या येत होत्या.

Sohail Khan, Seema Khan (PC - FB and Instagram)

Sohail Khan Divorce: अरबाज खान (Arbaaz Khan) नंतर आता खान कुटुंबात आणखी एक घटस्फोट होणार आहे. सोहेल खान (Sohail Khan) ने पत्नी सीमा खान (Seema Khan) पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून दोघेही नुकतेच वांद्रे कोर्टात स्पॉट झाले होते. जिथे दोघेही कायदेशीररित्या घटस्फोट घेण्यासाठी आले होते. बातम्यांनुसार, सोहेल आणि सीमा यांच्या नात्यात बराच काळ तणाव होता आणि त्यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

अभिनेता सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान आता अधिकृतपणे वेगळे होत आहेत. या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते वांद्रे कोर्टातून बाहेर पडताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये सीमा घाईघाईने कोर्टातून बाहेर पडताना दिसत आहे, तर दुसरीकडे सोहेल नंतर अगदी आरामात दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (हेही वाचा - Virat Kohli ला जिममध्ये वर्कआऊट करताना पाहून Anushka Sharma खुश, नवऱ्याची केली स्तुती, पाहा कमेंट)

सोहेल खान आणि सीमा खान यांनी 1998 मध्ये सात फेरे घेतले होते. सोहेल आणि सीमा यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून सीमा सोहेलपासून वेगळी राहत असल्याच्या बातम्या येत होत्या. पण दोघांचा घटस्फोट होईल याची कुणालाही कल्पना नव्हती. लग्नानंतर इतक्या वर्षांनी अचानक असा घटस्फोट घेतल्याने सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सोहेल खानपूर्वी त्याचा मोठा भाऊ अरबाज खाननेही त्याची पत्नी मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतला आहे. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी त्यांचे 18 वर्षांचे वैवाहिक जीवन तोडून स्वत:साठी वेगवेगळे मार्ग निवडले आणि आता सोहेल मोठ्या भावाच्या मार्गावर चालत आपले लग्न मोडून स्वत:साठी वेगळा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. सीमा खान व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोहेल खान आणि सीमा सचदेव यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटासारखी आहे. दोघेही पहिल्याच नजरेत प्रेमात पडले. धर्म भिन्न असल्यामुळे लग्नात अडचण आली. सीमा घरातून पळून जाऊन सोहेलकडे गेली आणि मौलवीचेही लग्नासाठी अपहरण करण्यात आले. मात्र, 24 वर्षांनंतर या लग्नाचा रंग फिका पडला आहे. त्यानंतरच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now