Rajinikanth यांची मोठी घोषणा, यापुढे राजकारणात प्रवेश करणार नाहीत; 'हे' सांगितलं कारण
मात्र, त्यांनी राजकारणात प्रवेश न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
भारतीय सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. नवीन वर्षाबरोबरअखेर त्यांनी आपणही राजकारण जगात पाऊल टाकणार असल्याचं म्हटलं होतं. 31 डिसेंबर रोजी ते यासंदर्भात मोठी घोषणा करणार होते. मात्र, आता रजनीकांत यांनी राजकारणाच्या जगात प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तरीदेखील लोकांसाठी काम करत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रजनीकांत यांनी स्वत: याविषयी माहिती दिली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, रजनीकांत हे कोणताही राजकीय पक्ष सुरू करणार नाहीत.
रजनीकांत यांच्या घोषणेमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी राजकारणात पाऊस न ठेण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीचं हैदराबादमध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रजनीकांत यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं. रजनीकांत यांना उच्च रक्कदाबाचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - Rajinikanth Health Update: अभिनेते रजनीकांत यांची प्रकृती स्थिर; आज अपोलो हॉस्पिटल मधून मिळणार डिस्चार्ज)
दरम्यान, रजनीकांत हे नव्या पक्षाची स्थापना करू शकता, असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधण्यात येत होता. मात्र, त्यांनी राजकारणात प्रवेश न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. असं असलं तरी, रजनीकांत जनतेसाठी काम करत राहणार आहेत. त्यांच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे.