अभिनेता Hrithik Roshan पुन्हा बोहल्यावर चढण्याचा तयारीत? यावर्षी गर्लफ्रेंड Saba Azad शी लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांच्या लग्नाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, हृतिक आणि सबा दोघेही त्यांच्या लग्नाचे प्लॅनिंग करत आहेत, पण त्यांना कोणतीही घाई करायची नाही. या वर्षाच्या अखेरीस कदाचित ते लग्नबंधनात अडकतील.

अभिनेता Hrithik Roshan पुन्हा बोहल्यावर चढण्याचा तयारीत? यावर्षी गर्लफ्रेंड Saba Azad शी लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा
Hrithik Roshan and Saba Azad (संग्रहित संपादित प्रतिमा)

बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन (Hrithik Roshan) आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. पर्सनल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही बाबतीत हृतिक रोशन एका चांगल्या फेजमधून जात आहे. लवकरच हृतिक दीपिका पदुकोणसोबत फायटर या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्याच वेळी, आता बातम्या येत आहेत की बॉलिवूडचा ग्रीक गॉड यावर्षी त्याची गर्लफ्रेंड सबा आझादशी (Saba Azad) लग्न करण्याच्या तयारीत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हृतिक आणि सबा एकमेकांना डेट करत आहेत व हृतिक रोशनचे कुटुंबही सबाबाबत खूप आनंदी आहे. त्यांनी सबाला स्वीकारले असल्याची माहिती मिळत असून, अहवालानुसार हृतिक आणि सबा यावर्षी लग्न करू शकतात.

हृतिक रोशन आणि सबा आझाद अनेकदा एकत्र दिसले आहेत. कधी पार्टी तर कधी दोघेही एकत्र सुट्टीचा आनंद लुटताना दिसतात. चाहत्यांनाही दोघांची जोडी आवडते आणि अशा परिस्थितीत आता हृतिक आणि सबा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. हृतिक रोशनचे कुटुंबही या दोघांच्या नात्याबद्दल खूप आनंदी आहे. इतकेच नाही तर हृतिकची माजी पत्नी सुजैन खान आणि मुलाचेही सबासोबत चांगले संबंध आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांच्या लग्नाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, हृतिक आणि सबा दोघेही त्यांच्या लग्नाचे प्लॅनिंग करत आहेत, पण त्यांना कोणतीही घाई करायची नाही. या वर्षाच्या अखेरीस कदाचित ते लग्नबंधनात अडकतील. सध्या दोघेही त्यांच्या कामात व्यस्त आहेत आणि आपल्या लग्नाचा कालावधी त्यांनी आपल्या कुटुंबासोबत व्यतीत करायचा आहे. त्यामुळे कामातून उसंत मिळाल्यावर ते लग्नाचा निर्णय घेतील. (हेही वाचा: प्रतिक्षा संपली! किंग खानचा बहुचर्चित सिनेमा पठाणचा ट्रेलर प्रदर्शित, बॉलिवूडचा बादशाह Shah Rukh Khan चा पाच वर्षांनंतर दमदार कमबॅक; Watch Video)

परंतु हे लग्न अजिबात भव्य होणार नसल्याची माहिती मिळत आहे. या लग्नात कुटुंबीय, सुझान खानसह फक्त त्यांचे जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. हृतिक रोशनचे आजही त्याची माजी पत्नी सुझैनसोबत चांगला संबंध आहेत. दोघेही अनेकदा त्यांच्या मुलांसोबत स्पॉट झाले आहेत. सुझान सध्या अर्सलान गोनीला डेट करत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2023 07:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).