Himansh Kohli Covid Tests Positive: बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोना विषाणूची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती
आतापर्यंत अनेक दिग्गज नेते तसेच कलाकार कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. अशातचं आता बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहली (Himansh Kohli) आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
Himansh Kohli Covid Tests Positive: भारतात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज नेते तसेच कलाकार कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. अशातचं आता बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहली (Himansh Kohli) आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Test Positive) आली आहे.
हिमांशने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. यात हिमांशने सांगितलं आहे की, 'नमस्कार, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्यात कोरोनाची लक्षणं दिसत होती. सध्या मी 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईनमध्ये आहे. माझ्यावर घरातचं उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणूची लागण कधीही कोठेही होऊ शकते. त्यामुळे स्वच्छता राखा आणि स्वत:ची काळजी घ्या,' असं आवाहनदेखील हिमांशने आपल्या चाहत्यांना केलं आहे. (हेही वाचा -Nitesh Rane On Kangana Ranaut: बेबी पेंग्विनला वाचवायचं आहे, कंगना तो एक बहाना है - नितेश राणे)
भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 40 लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासात देशात 86,432 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 1089 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 40,23,179 इतकी झाली आहे. आतापर्यंत अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले. मात्र, यातील अनेकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.