Vikram Khakhar Cheated Actor Deepak Tijori: अभिनेता दीपक तिजोरी यांची निर्मात्याकडून फसवणूक, आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
बॉलिवूडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका निर्मात्याने अभिनेत्याची फसवणूक केल्याची उघडकीस आले आहे. बॉलिवूडचा अभिनेता दिपक तिजोरी यांने निर्माता विक्रम खाखर यांच्यावर फसवणूकीचा आरोप केला आहे.
Vikram Khakhar Cheated Actor Deepak Tijori: बॉलिवूडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका निर्मात्याने अभिनेत्याची फसवणूक केल्याची उघडकीस आले आहे. बॉलिवूडचा अभिनेता दिपक तिजोरी यांने निर्माता विक्रम खाखर यांच्यावर फसवणूकीचा आरोप केला आहे. लंडनमध्ये चित्रपटाची निर्मिती करण्याच्या बहाण्याने अभिनेत्याकडून पैसे घेतले. फसवणूक केल्याचे लक्ष्यात आल्यानंतर अभिनेत्याने निर्माता विक्रम यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. (हेही वाचा- प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर जॉनी मास्टरला बेंगळुरूमध्ये अटक, २१ वर्षीय महिलेने केला लैंगिक अत्याचाराचा आरोप)
मिळालेल्या माहितीनुसार, लंडनमध्ये चित्रपटाची निर्मिती करण्याच्या बहाण्याने अभिनेता दीपक तिजोरी यांच्याकडून १८. ४० लाख रुपयांची फसवणूक केली. खाखरने दीपक यांना टीप्सी नावाचा चित्रपट तयार करण्याचे आश्वासन दिले आणि ज्यासाठी निर्मात्याने त्यांच्यातडून १७. ४० लाख रुपये घेतले. परंतु निर्मात्याने कोणत्याही चित्रपटाचे शुटिंग सुरु न केल्याचे दिसले. त्यानंतर दिपक यांनी आंबोली पोलिस ठाण्यात या घटनेविषयी तक्रार दिली. आंबोली पोलिसांनी चित्रपट निर्माता विक्रम खाखर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दीपक यांनी सांगितले की, चित्रपटाच्या स्थितीसंदर्भात जेव्हा पण विचारणा केली त्यावेळी विक्रम यांनी कोविडचे कारण देऊन चित्रपटाचे शुटिंग थांबल्याचे सांगितले. टिप्सी चे शूटिंग सुरु करण्याचा निर्मात्याचा कोणताही इरादा नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने त्यांचे पैसे परत मागितले, मात्र, पैसे परत न केल्यामुळे त्यांच्याविरुधात गुन्हा दाखल करण्यात आला.
(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2024 10:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

