Drink And Drive Case: अभिनेते Dalip Tahil यांना 'ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात' दोन महिन्यांचा तुरुंगवास; प्रदीर्घ काळ चाललेल्या खटल्यात कोर्टाचा निर्णय

आम्ही या संपूर्ण निर्णयाला आणि संपूर्ण निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देत आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अपघातात जखमी व्यक्तीला किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्याला किरकोळ औषध देऊन रुग्णालयातून पाठवण्यात आले.

Dalip Tahil (PC - Instagram)

Drink And Drive Case: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते दलीप ताहिल (Actor Dalip Tahil) संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. दलीप ताहिलला दोन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अभिनेत्याला पाच वर्षांपूर्वी घडलेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण 2018 सालचे आहे. ताहिलवर 2018 मध्ये मुंबईच्या खार उपनगरी भागात दारूच्या नशेत एका ऑटोरिक्षाला कारने धडक दिल्याचा आरोप आहे. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टरांच्या अहवालात अल्कोहोलचा वास आणि अभिनेता त्यावेळी कार नीट चालू शकत नसल्याच्या पुराव्यावर विश्वास ठेवून कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय, अपघाताच्या वेळी अभिनेत्याला नशेत नीट बोलताही येत नव्हते. (हेही वाचा - Smoking Warning: 'ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर धूम्रपानविषयक इशारे देण्याबाबत कोणतही तडजोड नाही'; केंद्र सरकारने फेटाळला मिडिया रिपोर्ट्सचा दावा, जारी केले स्पष्टीकरण)

हे सर्व पुरावे लक्षात घेऊन न्यायदंडाधिकाऱ्यांनी दलीप ताहिलला दोषी ठरवून दोन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. पाच वर्षे जुन्या प्रकरणात दलीप ताहिलला मुंबईतून अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर या अभिनेत्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांपासून या प्रकरणी सुनावण्या सुरू होत्या. आता याप्रकरणी निकाल देताना न्यायालयाने दलीपला दोन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. दलीप ताहिल यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, 'न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी न्यायालयात घेतलेल्या निर्णयांचा मी आदर करतो. आम्ही या संपूर्ण निर्णयाला आणि संपूर्ण निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देत आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अपघातात जखमी व्यक्तीला किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्याला किरकोळ औषध देऊन रुग्णालयातून पाठवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, दलीप ताहिल यांनी ऑटोरिक्षाला धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला होता. यासोबतच दलीपने रक्त तपासणीसाठी पोलिसांना आपला नमुना देण्यास साफ नकार दिल्याचेही एका अहवालात सांगण्यात आले आहे. दलीप ताहिल यांनी बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यात बाजीगर, राजा, इश्क आणि डर या चित्रपटांचा समावेश आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif