Actor Bikramjeet Kanwarpal Passes Away: अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोविड-19 मुळे निधन; निर्माता अशोक पंडित ने ट्विट करत वाहिली श्रद्धांजली
'24' वेब सीरिजमध्ये तेअनिल कपूरसोबतही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.
Actor Bikramjeet Kanwarpal Passes Away: भारतीय चित्रपट आणि टीव्ही शो अभिनेता बिक्रमजित कंवरपाल यांचे कोरोना विषाणूमुळे निधन झाले. ते कोविड-19 पॉझिटिव्ह होते. आज अखेर त्यांची कोरोना विरूद्धची झुंज अपयशी ठरली. आज त्यांनी या जगाला निरोप दिला. अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये बिक्रमजित यांनी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका साकारल्या आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता आशोक पंडित यांनी आपल्या ट्विटरवर ही दुखद बातमी शेअर करताना त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशोक पंडित यांनी ट्विटरमध्ये लिहिलं आहे की, "कोविडमुळे मेजर बिक्रमजित कंवरपाल यांचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून फार वाईट वाटले. बिक्रमजित यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. ते एक सेवानिवृत्त सैन्य अधिकारी होते. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल माझ्या संवेदना. ॐ शांती." (वाचा - Akshay Kumar ने सोशल मिडियाद्वारे सांगितल्या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी '4' महत्त्वाच्या कृती)
बिक्रमजितने भारतीय सैन्यातही काम केले आहे. '24' वेब सीरिजमध्ये तो अनिल कपूरसोबतही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. कोरोना साथीच्या आजारामुळे करमणूक जगाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी कोविड-19 मुळे आपला जीव गमावला आहे. अलीकडेचं संगीतकार श्रवण राठोड यांनीही या जगाचा निरोप घेतला.