Drugs Case: अभिनेता Arjun Rampal ने NCB कार्यालयात चौकशीला सामोरं जाण्यासाठी मागितला 21 डिसेंबर पर्यंत वेळ
मात्र अर्जुनने एनसीबीकडे मुदतवाढ मागितली आहे. त्याने 21 डिसेंबरपर्यंत वेळ द्यावा असं म्हटलं आहे.
सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर ड्रग्स कनेक्शनमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार एनसीबीच्या रडारवर आहेत. यामध्ये अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याचा देखील समावेश आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीने समन्स बजावत अर्जुन रामपाल याला आज (16 डिसेंबर) सादर होण्यास सांगितले होते. मात्र ANI Tweets नुसार अर्जुनने एनसीबीकडे मुदतवाढ मागितली आहे. त्याने 21 डिसेंबरपर्यंत वेळ द्यावा असं म्हटलं आहे. आता 22 डिसेंबरला सकाळी 11 वाजता हजर होऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी अर्जुन रामपालची एनसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. त्यावेळेस अर्जुनची गर्लफ्रेंड गेब्रिएलाची देखील एनसीबीकडून सुमारे 6 तास चौकशी झाली होती. यावेळी तिचा भाऊ अगिसिलाओस याच्या ड्रग्ज संबंधित प्रश्न सुद्धा विचारले गेले होत्याचं वृत्त समोर आलं होतं. एनसीबीने अर्जुनच्या वांद्रे येथील निवासस्थानी छापा टाकला होता मात्र त्यावेळेस घरी ड्रग्स मिळाले नाही. मात्र काही सामान जप्त करण्यात आले होते. ड्रायव्हरची देखील चौकशी झाली. हेदेखील वाचा-Drug Case: अभिनेता अर्जुन रामपाल याचा मित्र Paul Bartel याला ड्रग्ज संबंधित प्रकरणात NCB कडून अटक.
ANI Tweet
दरम्यान काही दिवसांपूर्वी विनोदी कलाकार भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका देखील झाली आहे. तर चौकशीसाठी दीपीका पदुकोण, सारा अली खान, रकूल प्रीत सिंह आदी कलाकारांना बोलावण्यात आलं होतं.