Sushant Singh Rajput Case: अभिनेत्री अंकिता लोखंडे ने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास CBI कडे देण्याच्या आदेशावर केले 'हे' ट्वीट

काही वेळापूर्वी त्या प्रकारचं ट्वीट करण्यात आलं होतं. सुशांतच्या बहीणीकडूनही भगवतगीतेतील एक फोटो शेअर करत न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली होती.

Sushant Singh Rajput And Ankita Lokhande (Photo Credit: Twitter)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी आता सीबीआय चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)  सीबीआयला (CBI) सहाकार्य करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान 14 जून दिवशी सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करत जीवन संपवलं. सुशांतच्या अशाप्रकारे जीवन संपवण्याच्या त्याच्या निर्णयाने त्याच्या चाहत्यांसोबतच मित्र मैत्रिणी आणि प्रियजनांना धक्का बसला होता. दरम्यान सुशांतच्या मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी आता सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी पुढे आली होती. आता ही मागणी पूर्ण झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. सुशांतची मैत्रिण आणि सहकलाकार अंकिता लोखंडेने  (Ankita Lokhande) देखील सीबीआय चौकशी बद्दल समाधान व्यक्त केले आहे.

अंकिता आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत होती. काही वेळापूर्वी त्या प्रकारचं ट्वीट करण्यात आलं होतं. सुशांतच्या बहीणीकडूनही भगवतगीतेतील एक फोटो शेअर करत न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली होती. अंकिता लोखंडे, वरुण धवन सह या सेलिब्रिटींनी केला #CBIForSSR कॅम्पेनला सपोर्ट.  

अंकिता लोखंडे ट्वीट 

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पाटणा पोलिसांची FIR योग्य असल्याचं म्हटलं आहे. 14 ऑगस्टला सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला 2 महिने पूर्ण झाले होते. त्यावेळेस बॉलिवूडकरांनी, सुशांतच्या बहिणीकडून विशेष हॅशटॅग मोहिम चालवून सीबीआयच्या चौकशीची मागणी केली होती. दरम्यान सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने देखील सीबीआय चौकशीची मागणी केली होती.