Bholaa Trailer Out: अॅक्शन चित्रपट 'भोला'चा ट्रेलर रिलीज; अजय कैदी तर अभिनेत्री तब्बू दिसली पोलिसांच्या भूमिकेत
या चित्रपटात वडील आणि मुलीचे बॉन्डिंगही पाहायला मिळणार आहे. भोला 30 मार्च 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट 3D आणि IMAX या दोन्ही प्रकारात प्रदर्शित होणार आहे.
Bholaa Trailer Out: दृश्यम 2 (Drishyam 2)च्या प्रचंड यशानंतर चाहते आता अजय देवगण (Ajay Devgn) च्या भोला (Bhola) या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत. चित्रपटाचा टीझर आणि व्हीएफएक्सने प्रेक्षकांना आधीच प्रभावित केले आहे. चाहत्यांची प्रतीक्षा संपवत आता अजय देवगणने 'भोला' चित्रपटाच्या थ्रिलर ट्रेलर (Bholaa Trailer) शेअर केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भोलाच्या ट्रेलर रिलीजची तयारी सुरू होती. अजय देवगणने गेल्या आठवड्यातच ट्रेलरच्या रिलीजची तारीख जाहीर केली होती. तथापि, चाहत्यांना उत्साही ठेवण्यासाठी, अभिनेत्याने नवीन मोशन पोस्टर्ससह चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. आता अखेर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. (हेही वाचा -Nawazuddin Siddiqui on Wife Aaliya Siddiqui: पत्नीसोबतच्या वादावर नवाजुद्दीन सिद्दीकीने तोडले मौन; म्हणाला, 'मी दर महिन्याला 10 लाख देतो, आलियाला आणखी पैसे हवेत')
अजयचा भोला हा देखील दक्षिण चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. भोलाची कथा साऊथच्या ब्लॉकबस्टर चित्रपट कार्ती मधून साकारण्यात आली आहे. मूळ चित्रपटात अभिनेता कार्तीची मुख्य भूमिका होती आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला होता.
भोला चित्रपटात तब्बू पुन्हा एकदा अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय दीपक डोबरियाल आणि शरद केळकर यांसारख्या प्रस्थापित कलाकारांच्या भूमिकाही या चित्रपटात आहेत. या चित्रपटात तब्बू पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे, तर दीपक डोबरियाल नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. भोलाची कथा ड्रग माफियांभोवती फिरते. या चित्रपटात वडील आणि मुलीचे बॉन्डिंगही पाहायला मिळणार आहे. भोला 30 मार्च 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट 3D आणि IMAX या दोन्ही प्रकारात प्रदर्शित होणार आहे.
भोलामध्ये अभिनयासोबतच अजयने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. त्याच्या दिग्दर्शनात बनलेला हा चौथा चित्रपट आहे, याआधी अजयने यू मी और हम, शिवाय, रनवे 34 सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्याचबरोबर टी-सिरीज, रिलायन्स एंटरटेनमेंट आणि अजय देवगण फिल्म्स यांनी भोलाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे.