Academy Awards 2020: अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या The Last Color चित्रपटास ऑस्कर नामांकन
आपल्या ट्विटमध्ये विकास खन्ना यांनी म्हटले आहे की, 'सन 2020 ची सर्वात सुंदर सुरुवात. जादू... जादू.. युनिवर्स आपले आभार. आमचा विनम्र चित्रपट 'द लास्ट कलर' शुद्ध हृदय आहे. ऑस्कर: अॅकेडमीने 344 बेस्ट पिक्चर्सची घोषणा केली'. आमच्यासाठी हा अत्यंत सुदर क्षण असल्याचेही विकास खन्ना यांनी म्हटले आहे.
Oscars 2020: अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांच्या 'द लास्ट कलर' (The Last Color) चित्रपटास 92 व्या अॅकेडमी अवॉर्ड ( Academy Awards) म्हणजेच ऑस्कर (Oscars) नामांकन मिळाले आहे. उत्कृष्ट फीचर फिल्म (Best Feature Film The Last Color) श्रेणीत द लास्ट कलर चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. चित्रपट दिग्दर्शक विकास खन्ना (Vikas Khanna) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर नामांकन यादीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. आपल्या ट्विटमध्ये विकास खन्ना यांनी म्हटले आहे की, 'सन 2020 ची सर्वात सुंदर सुरुवात. जादू... जादू.. युनिवर्स आपले आभार. आमचा विनम्र चित्रपट 'द लास्ट कलर' शुद्ध हृदय आहे. ऑस्कर: अॅकेडमीने 344 बेस्ट पिक्चर्सची घोषणा केली'. आमच्यासाठी हा अत्यंत सुदर क्षण असल्याचेही विकास खन्ना यांनी म्हटले आहे.
माझ्यासाठी हा सर्वात सुंदर क्षण - विकास खन्ना
आपल्या पुढच्या ट्विटमध्ये विकास खन्ना यांनी म्हटले आहे की, 'मला हे सगळे स्वीकारण्यासाठी काहीसा अवधी हवा आहे. मला माहित नाही की, याच्यापुढे काय होते. पण, 2019 ची बेस्ट फीचर फिल्स्मच्या यादीत समावेश होणे हा माझ्यासाठी हा सर्वात सुंदर क्षण आहे.'
मी खूप खूश आहे - नीना गुप्ता
नीना गुप्ता यांना टॅग करत विकास खन्ना यांनी ट्विटरवर लिहिले आहे, 'माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल खूप खूप आभार. आपल्याला खूप खूप शुभेच्छा.' नीना गुप्ता यांनीही विकास खन्ना यांच्या ट्विटला प्रतिसाद देत आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, 'विश्वासही बसत नाही... मी खूप खूश आहे.'
विकास खन्ना ट्विट
द लास्ट कलर: विधवांचे जीवन आणि समाजाची मानसिकता
'द लास्ट कलर' चित्रपटात भारतीय समाज (खास करुन वृंदावन आणि वाराणसी) विधवा महिलांबाबत काय विचार करतो. चित्रपटात नीना गुप्ता यांनी 70 वर्षांच्या विधवा नूर हिची भूमिका साकारली आहे. ही कहाणी आहे विधवा नूर आणि 9 वर्षांची छोटी (अक्सा सिद्दीकी) यांची. शाळेत जाण्याचे स्वप्न पाहणारी बेघर आणि अनाथ छोटी आपल्या चरितार्थासाठी फुले विकत असते. नूर तिची स्वप्नं साकार करण्यासाठी मदत करते. मात्र, विधवा असल्याने नूरला आलेल्या संघर्षाची कहाणी दाखवत चित्रपट पुढे सरकतो. (हेही वाचा, 66th National Film Awards 2019: अक्षय कुमार, विक्की कौशल, आयुष्मान खुराना हे परस्काराचे मानकरी (Watch Videos))
नीना गुप्ता इन्स्टाग्राम पोस्ट
'द लास्ट कलर' पदार्पणातच ऑस्कर नामांकन
विशेष असे की, एक शेफ ते दिग्दर्शक असा प्रवास करणाऱ्या विकास खन्ना यांची 'द लास्ट कलर' हा पहिलाच चित्रपट आहे. पदार्पणातच ऑस्कर नामांकन मिळाल्याने दिग्दर्शक विकास खन्ना यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा चित्रपट 4 जानेवारी 2019 मध्ये पाम स्प्रिंग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाचे स्क्रीनिंग डल्लास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, न्यूयॉर्क इंडिया चित्रपट महोत्सव वॉशिंग्टन डीसी दक्षिण अशीया चित्रपट महोत्सव, मुंबई चित्रपट महोत्सव आणि न्यूजर्सी इंडियन अॅण्ड इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल सह इतरही अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट झळकला आहे. या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग युनायटेड नेशनच्या मुख्य कार्यालयातही करण्यात आले होते. नीना गुप्ता यांना या चित्रपटासाठी इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल ऑफ बोस्टन मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही देण्यात आला होता.
दरम्यान, रणवीर सिंह आणि अलिया भट्ट यांचा बहुचर्चित 'गली ब्वॉय' हा चित्रपट विदेशी भाषा (फॉरेन लँग्वेज) श्रेणीत ऑस्करसाठी पाठविण्यात आला होता. जोया अख्तर यांच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट ऑस्कर नामांकनामध्ये आपली जागा बनवू शकला नाही. उत्कृष्ट डॉक्यूमेंट्री फिल्म या श्रेणीत पाठविण्यात आलेला 'मोती बाग' हा चित्रपटही ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यात उत्तराखंड राज्यातील कहाणी दाखवण्यात आली होती. दरम्यान 'द लास्ट कलर' चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.