अभिषेक बच्चन याच्या 'जनता कर्फ्यू' च्या संदेशावर ट्रोल करणा-यांवर भडकला ज्युनिअर बी, अशा शब्दांत दिले उत्तर

यावर अभिषेकला नेटक-यांकडून ट्रोल करण्यात आले.

Abhishek Bachchan (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसचे वाढता फैलाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज आयोजित केलेल्या 'जनता कर्फ्यू' (Janta Curfew) ला संपूर्ण देशवासियांनी भरघोस प्रतिसाद दिला. या जनता कर्फ्यूला सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यावा यासाठी सर्व बॉलिवूड कलाकारांनी या मोहिमेत सहभागी होण्याचा जनतेला संदेश दिला. मात्र जनतेला दिलेला हाच संदेश अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)  ची डोकेदुखी झाला. कारण त्याने दिलेल्या संदेशावरुन ट्रोलर्सने त्याचीच फिरकी घ्यायला सुरुवात केली.

अभिषेक बच्चन ने ट्विटच्या माध्यमातून जनतेला 'Be Safe, Be Happy, Be Responsible' राहण्याचा सल्ला दिला. यावर अभिषेकला नेटक-यांकडून ट्रोल करण्यात आले.

यातील एका ने तर सरळ सरळ अभिषेकला 'तू लोकांना असा संदेश देत आहेत कारण तुझ्याकडे घरात राहण्याचा मोठा अनुभव आहे', या ट्रोलरवर अभिषेक चिडला. बॉलिवूड कलाकारांकडून डॉक्टर, परिचारीका, सफाई कामगार, रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतूक; अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, यांच्यासह अनिल कपूर यांनीही अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे मानले आभार

पाहा काय दिले अभिषेकने उत्तर

बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांच्यासह अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अक्षय कुमारनेही (Akshay Kumar) ट्वीटरच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे कौतूक करत त्यांचे आभारही मानले आहेत. देशावर कोरोना व्हायरसचा संकट वावरत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांसाठी लढा देत असलेल्या कर्मचाऱ्यांवर संपूर्ण देशातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif