The Big Bull सिनेमा पाहून Amitabh Bachchan यांची Abhishek Bachchan ला कौतुकाची थाप; सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केल्या भावना

या सिनेमावर संमिश्र प्रतिक्रीया उमटत असताना अमिताभ बच्चन यांनी मात्र मुलगा अभिषेक बच्चन याला कौतुकाची थाप दिली आहे.

Abhishek Bachchan & Amitabh Bachchan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याच्या 'द बिग बुल' (The Big Bull) सिनेमाने ओटीटी फ्लॅटफॉर्मवर सध्या धुमाकूळ घातला आहे. ओटीटीवर (OTT) रिलीज होणारा हा या वर्षातील सर्वात मोठा सिनेमा समजला जात आहे. या सिनेमावर संमिश्र प्रतिक्रीया उमटत असताना अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मात्र मुलगा अभिषेक बच्चन याला कौतुकाची थाप दिली आहे. वडील म्हणून अभिषेकबद्दल वाटणारा अभिमान त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर द बिग बुल सिरीजमधील अभिषेक बच्चनचा फोटो शेअर करत लिहिले, "वेल डन बडी. एक अभिमानी वडील." त्याचबरोबर बिग बी यांनी 'WHTCTW' देखील लिहिले आहे. यामुळे चाहते गोंधळात पडले असून याचा नेमका अर्थ काय असावा यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे या पोस्टवर अभिषेकची भाची नव्या नवेली नंदा हिने हार्ट इमोजी पोस्ट करत आपली पसंती दर्शवली आहे.

पहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अभिषेक बच्चनच्या द बिग बुल सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी बिग बी यांनी देखील पुढाकार घेतला होता. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी या सिनेमाचे जबरदस्त प्रमोशन केले. हा सिनेमा 8 एप्रिल रोजी डिज्नी+हॉटस्टारवर रिलीज करण्यात आला. यापूर्वी हा सिनेमा 8 नोव्हेंबर 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, तेव्हा प्रदर्शिन न झालेला सिनेमा एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

दरम्यान, द बिग बुल सिनेमाची तुलना स्कॅम 1992 वेबसिरीजशी केली जात असून यात हर्षद मेहताची भूमिका साकारणाऱ्या प्रतिक गांधीच्या अभियनाशी देखील अभिषेकच्या अभिनयाची तुलना होत आहे.