आमिर खान याची मुलगी इरा खान हिचा बॉयफ्रेंडसोबत रोमॅन्टिक डान्स व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

त्यांनी केलेल्या लहान सहान गोष्टींची चर्चा होते. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक इरा खान तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली आहे.

Ira Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचे स्टार किड्स नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. त्यांनी केलेल्या लहान सहान गोष्टींची चर्चा होते. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची (Aamir Khan) लेक इरा खान (Ira Khan) तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी इराने तिच्या इन्टा स्टोरीतून ती मिशाल कृपलानीला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर आता तिचे काही फोटोज आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत इरा बॉयफ्रेंडसोबत रोमॅन्टिक डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत इराने लिहिलं की, 'मला फक्त तुझ्यासोबत डान्स करायचा आहे.' यापूर्वीही इराने मिशालसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पहा व्हिडिओ:

फोटोज:

इरा ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. गेल्या वर्षी रमजान निमित्त शेअर केलेल्या फोटोमुळे आमिर आणि इराला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते.