Aamir Khan आणि Kiran Rao यांची 'Lagaan' च्या सेटवर झाली पहिली भेट; अशी फुलली प्रेमकहाणी
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी आज एकमेकांपासून विभक्त होत असल्याचे जाहीर केले. जॉईंट स्टेटमेंटद्वारे त्यांनी वेगळे होत असल्याची माहिती सर्वांना दिली. तब्बल 15 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घेतलेला हा निर्णय चाहत्यांसह अनेकांसाठी धक्कादायक आहे.
Aamir Khan and Kiran Rao Love Story: बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी आज एकमेकांपासून विभक्त होत असल्याचे जाहीर केले. जॉईंट स्टेटमेंटद्वारे त्यांनी वेगळे होत असल्याची माहिती सर्वांना दिली. तब्बल 15 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घेतलेला हा निर्णय चाहत्यांसह अनेकांसाठी धक्कादायक आहे. दरम्यान, आमिर आणि किरण यांची प्रेमकहाणी काय आहे? त्यांची पहिली भेट कुठे झाली? हे जाणून घेऊया. तसंच 15 वर्षांचा त्यांचा प्रवास, काम, मीडिया अॅपियरन्स या सगळ्यावर एक नजर टाकूया...
आमिर आणि किरण यांची पहिली भेट सुमारे 20 वर्षांपूर्वी 'लगान' सिनेमाच्या सेटवर झाली. या सिनेमात आमिर प्रमुख भूमिकेत होता. तर किरण राव असिस्टेंट डिरेक्टर म्हणून काम पाहत होती. त्यादरम्यान त्यांची केवळ ओळखच होती, असे आमिरने अनेकदा मुलाखतीत सांगितले आहे.
आमिरचे पूर्वीच लग्न झाले होते. त्यामुळे पहिल्या पत्नी रिना दत्ता यांच्यासाठी हा मोठा कठीण काळ होता. अखेर 2002 मध्ये आमिर आणि रिना यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर काही काळाने आमिर आणि किरण यांच्यात जवळीक वाढली आणि दोघेही रिलेशनशीपमध्ये अडकले. मीडिया रिपोर्टनुसार, आमिर आणि किरण काही काळ लिव्ह-इन मध्ये राहत होते. त्यानंतर 28 डिसेंबर 2005 रोजी दोघांनी लग्न केले. आमिर आणि किरण यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव आजाद राव खान असे असून तो आता 9 वर्षांचा आहे. (Aamir Khan Announces Divorce: आमिर खान-किरण राव यांच्या नात्याला ब्रेक, 15 वर्षानंतर घेणार घटस्फोट)
किरणसोबत खूप खुश असल्याची जाहीर कबुली आमिर खान याने अनेकदा मीडियासमोर दिली आहे. तसंच अनेकदा कठीण काळात किरणने खंबीरपणे साथ दिल्याचेही त्याने सांगितले आहे. लग्नानंतर अनेक ठिकाणी एकत्र दिसणारे आमिर-किरण यांनी अनेकदा आपल्या प्रेमभावना मीडियासमोर बोलून दाखवल्या आहेत. पब्लिकली किस करतानाच त्यांचा व्हिडिओ देखील चांगलाच चर्चेत आला होता.
आमिर-किरण यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशनचं मोठं काम सुरु केले. यामुळे राज्यातील अनेक भाग पाणीमय झाले आहेत. तसंच याद्वारे आयोजित करण्यात येणारी 'वॉटर कप स्पर्धा' लोकप्रिय आहे. दरम्यान, आमिरने यापूर्वी देखील सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत त्यात आपले योगदान दिले आहे. विशेष म्हणजे घटस्फोटानंतरही पाणी फाऊंडेशनचे काम दोघे मिळून करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसंच मुलाचे संगोपनही ते दोघे मिळून करण्यात असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
'दंगल' सिनेमानंतर फातिमा सना शेखसोबत आमिर खानचं नाव जोडलं गेलं होतं. परंतु, फातिमासह किरण रावने देखील हे वृत्त फेटाळून लावलं होतं. मात्र आमिरच्या दुसऱ्या घटस्फोटानंतर आता पुन्हा एकदा विविध चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, आमिर-किरणची जोडी अनेकांना भावते. मराठी कॉमेडी शो 'चला हवा येऊ द्या' मध्येही दोघांनी एकत्र हजेरी लावत धम्माल केली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)