Nusrat Jahan On BJP: 'हिजाब घातला तरी प्रोब्लेम, बिकिनी घातली तरी प्रोब्लेम'; 'पठाण' चित्रपट वादावरून नुसरत जहाँचे भाजपवर टीकास्त्र
जर एखाद्या स्त्रीने हिजाब घातला तरी यांना प्रोब्लेम आहे. जर एखाद्या महिलेने बिकिनी घातली तरी या लोकांना त्रास होतो. खरं तर या लोकांना प्रत्येक गोष्टीत अडचण आहे.'
Nusrat Jahan On BJP: पठाण चित्रपटातील 'बेशरम' गाण्यावरून (Besharam Song) सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि हिंदुत्ववादी संघटना या गाण्याबाबत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) ला सातत्याने विरोध करत आहेत. भाजप नेते आणि संघटनेशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की दीपिका पदुकोणला भगव्या रंगाचे कपडे घालून चित्रपट निर्मात्यांनी हिंदू धर्माचा अपमान केला आहे. आता या वादात टीएमसी खासदार आणि चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) हिने उडी घेतली आहे. नुसरत जहाँ यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे.
नुसरत जहाँने सांगितले की, या लोकांना प्रत्येक गोष्टीत अडचण आहे. नुसरत जहाँ म्हणाल्या, 'सत्तेत बसलेला पक्ष लोकांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये नवे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जर एखाद्या स्त्रीने हिजाब घातला तरी यांना प्रोब्लेम आहे. जर एखाद्या महिलेने बिकिनी घातली तरी या लोकांना त्रास होतो. खरं तर या लोकांना प्रत्येक गोष्टीत अडचण आहे. हेच लोक नव्या पिढीच्या महिलांना काय घालायचे हे सांगत आहेत.' (हेही वाचा - Pathaan Controversy: हिंदुत्वाचा अपमान करणारा चित्रपट महाराष्ट्रात चालणार नाही; पठाण वादावर भाजप नेते राम कदम यांचा इशारा)
नुसरत पुढे म्हणाली, 'हे लोक आमच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण काय घालावं, काय खावं, कसं बोलावं, कसं चालावं, शाळेत काय शिकावं आणि टीव्हीवर काय बघावं... सगळं हे लोक ठरवत असतात. या तथाकथित नवविकसित भारतात आपल्याला त्यांच्या पद्धतीने वागवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे सर्व खूप भीतीदायक आहे. मला भीती वाटते की, हे सर्व जास्त दिवस चालले तर आपण कुठे पोहोचू हे माहित नाही.' (हेही वाचा - Pathaan Controversy: हिंदू संघटनांपाठोपाठ मुस्लिम संघटनांनेही पठाण चित्रपटाला सुरु केला विरोध, म्हणाले - चित्रपट देशभरात प्रदर्शित होऊ देणार)
ट्विटरवर या मुद्द्यावरून भाजप आणि टीएमसीमध्ये वाद झाला होता जेव्हा तृणमूल काँग्रेसचे नेते रिजू दत्ता यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्या फेमिना मिस इंडिया 1998 मध्ये सहभागी होताना दिसल्या होत्या. यात त्या भगव्या रंगाच्या कपड्यांमध्ये रॅम्पवर चालताना दिसत आहे. खरं तर, याआधी भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर कोलकाता फिल्म फेस्टिव्हलचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांनी गायक अरिजित सिंगचे 'रंग दे तू मोहे गेरुआ' या गाण्याचे कौतुक केले होते. या कार्यक्रमाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या. या ट्विटवर टीएमसी नेते रिजू दत्ता यांनी स्मृती इराणी यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.