Akshay Kumar ने सोशल मिडियाद्वारे सांगितल्या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी '4' महत्त्वाच्या कृती
अक्षय कुमारने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे
सध्या संपूर्ण भारत देश कोरोना विरुद्धचा लढा देत आहे. या लढ्यात सामाजिक संघटनांसह अनेक दिग्गज कलाकार आपापल्या परीने, सोशल मिडियाद्वारे या लढ्यात सामील झाले आहे. यातच खारीचा वाटा उचलत बॉलिवूड अभिनेता खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याने सोशल मिडियाद्वारे कोरोनाशी लढण्यासाठी सर्वांना '4' महत्त्वाच्या कृती सांगितल्या आहेत. या कृती WHO संस्थेकडून सांगण्यात आल्या आहेत. मात्र त्याच सोप्या आणि सहज कृती अक्षय कुमारने आपल्या सोशल अकाउंटवर पोस्ट करुन सांगितले आहे.
अक्षय कुमारने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे.हेदेखील वाचा- कौतुकास्पद! कन्नड सुपरस्टार Arjun Gowda कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी बनला रुग्णवाहिका चालक
जर तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर तुमचा मास्क योग्यरितीने लावा, जर तुमच्यात काही कोरोनाची लक्षणं आढळून आली असे वाटल्यास ताबडतोब स्वत:ला आयसोलेट करा, जास्त पॅनिक होऊ नका, कोविडवर घरीही इलाज करता येतो आणि सर्वात महत्त्वाचे लसीकरणासाठी नोंदणी करा आणि तुमचा नंबर येण्याची वाट पाहा, या चार महत्त्वाच्या कृती फॉलो करण्याचे अक्षय कुमारने सर्वांना सांगितल्या आहेत.
कोरोनाच्या दुस-या लाटेने संपूर्ण हाहाकार माजविला असून ऑक्सिजन, लस, औषधे आणि व्हेंटिलेटर यांसारख्या अनेक गोष्टींचा तुटवडा भासत आहे. यामुळे जॉनने अशा कोरोना रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. जॉनने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. देशातील जनतेची ही समस्या पाहता, जॉन आपले सोशल अकाउंट्स सामाजिक संस्थांना सुपूर्त करणार आहेत. ज्यामुले गरजूंना सहायताकर्ताशी सरळ भेट होईल, ज्याची त्यांना फार मदत होईल.