Bigg Boss Marathi Season 5: निक्की जान्हवीला घाबरते का? प्रश्न विचारताच पत्रकारांसमोर दोघी भांडल्या (Watch Video)
भाऊच्या धक्क्यावर बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये सर्व सदस्यांना मोठे धक्के बसणार आहेत. कारण पत्रकारांच्या अवघड प्रश्नांना घरातील सदस्यांना तोंड द्यावं लागणार आहे.
Bigg Boss Marathi Season 5: ‘नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये पत्रकार निक्कीला(Nikki Tamboli) प्रश्न विचारतातच ज्याच उत्तर दोघी देतात आणि परिणामी त्यांच्यात भांडणं होतात. ‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडियावर नुकताच हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये निक्की आणि जान्हवीच्या(Janhvi Killekar) नात्यावर एका पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यामुळे दोघींमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली. (हेही वाचा: Bigg Boss Video: बिग बॉस च्या घरात पार पडणार जंगलराज टास्क; बंदूक मिळवून कोण ठरणार खरा शिकारी?)
निक्की आणि जान्हवी
View this post on Instagram
या प्रोमोमध्ये एक पत्रकार निक्कीला प्रश्न विचारते की, जान्हवीला अजून तू तितकं सडेतोड उत्तर देत नाहीस. तू तिला घाबरतेस का? यावर जान्हवी म्हणाली, “ती मला घाबरते.” मग निक्की म्हणाली, “ती जे पण घरात करते ते फुटेजसाठी करते.” त्यानंतर जान्हवी म्हणतेय, “सगळ्यात पहिली चूक म्हणजे घरात आल्या आल्या चुकीच मैत्री.” तसंच निक्की म्हणतेय की, मी हिच्याशी संवाद केला तर ती दिसेल त्यामुळे मला ते मंजूर नाहीये. त्यावर जान्हवी ओरडून म्हणते, “तुझ्याबरोबर दिसण्यापेक्षा मी बाहेर जाईन.” अशा प्रकारे दोघी पत्रकारांसमोरच भांडताना दिसत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2024 09:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

