Bigg Boss Video: बिग बॉस च्या घरात पार पडणार जंगलराज टास्क; बंदूक मिळवून कोण ठरणार खरा शिकारी?
बिग बॉसच्या घरात आजच्या भागात नवा टास्क पहायला मिळणार आहे. 'जंगलराज' असं या टास्कला नाव देण्यात आलं आहे. बंदूक मिळवून कोण ठरणार खरा शिकारी?असं कलर्स मराठीकडून पोस्ट करण्यात आलेल्या नव्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) घरात दर आठवड्यात वेगवेगळे टास्क पार पडत असतात. प्रत्येक टास्कमध्ये सदस्यांना त्यांची तागद दाखवून तो टास्क पूर्ण करावा लागतो. जी टीम टास्क पूर्ण करण्यात अपयशी ठरते, त्या टीमला त्याची भरपाई करावी लागते. आता असाच एक नवा टास्क बिग बॉसच्या घरात पार पडणार आहे. 'जंगलराज' असं या टास्कला (Jungleraj Task) नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात पार पडणाऱ्या जंगलराजमध्ये कोण राज्य करणार आणि कोण बंदूक मिळवून कोण ठरणार खरा शिकारी? हे जाणून घेणे उत्सूकतेच ठरत आहे. (हेही वाचा: Bigg Boss Marathi Season 5: आर्या जाधवनंतर वैभव चव्हाण बिग बॉसच्या घराबाहेर; एकाच आठवड्यात दोन स्पर्धकांचा खेळ संपला)
'बिग बॉस मराठी'च्या प्रोमोमध्ये जान्हवी सूत्रसंचालन करत असल्याचे हायला मिळत आहे. घरावर या आठवड्यात जंगलराज असणार असल्याचं ती म्हणते. शिकाऱ्याची बंदूक जास्तीत जास्त मिळवणारी टीम या कार्यात यशस्वी होईल. टास्कमध्ये डीपी दादा म्हणत आहेत,'आपल्याला ते षडयंत्र वापरावं लागेल'. तर अरबाज म्हणतोय,'काहीही करा लीड आपल्याला करायचं आहे'. निक्की म्हणतेय,'टीम वाचलीच पाहिजे'. प्रोमोमध्ये शेवटी टास्क दरम्यान जान्हवीला दुखापत झाल्याचं पाहायला मिळत आहे.
बंदुक मिळवून कोण ठरणार खरा शिकारी?
घरावर असणार जंगलराज, बंदूक मिळवून कोण ठरणार खरा शिकारी?🫢
'BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर.#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #Promo pic.twitter.com/BB8Yv9zCUp
— Colors Marathi (@ColorsMarathi) September 16, 2024
दरम्यान काल पार पडलेल्या भागात बिग बॉसच्या घरात एलिमिनेशनची प्रक्रिया पार पडली. त्यात वैभव चव्हाणला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं. एलिमिनेशन राऊंडमध्ये वैभव चव्हाणसोबत आणखी पाच सदस्य नॉमिनेट होते. निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, अभिजीत सावंत हे सहा सदस्य नॉमिनेट होते.
(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 9203 05:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

