Bigg Boss Marathi Season 5 Grand Premiere: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा भव्य ग्रँड प्रीमियर सोहळा
अखेर आज ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा होणार आहे. यावर्षी स्पर्धकांसाठी ‘बिग बॉस’चं संपूर्ण घर काचेच्या महालासारखं सजवण्यात आलं आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Grand Premiere: ‘बिग बॉस मराठी’च्या बहुचर्चित पाचवा सीझनला (Bigg Boss Marathi 5 Grand Premiere)आता सुरुवात होणार आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख (Riteish Deshmukh)सांभाळणार आहे. त्यामुळे यंदाचा सीझन रितेश देशमुख स्टाईलने होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून कोण प्रवेश करणार याबद्दल मोठी उत्सुकता होती. अखेर आज ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा होणार आहे. यावर्षी स्पर्धकांसाठी ‘बिग बॉस’चं संपूर्ण घर काचेच्या महालासारखं सजवण्यात आलं आहे. (हेही वाचा: Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी होस्ट आणि संभाव्य स्पर्धक घ्या जाणून)
पोस्ट पहा
View this post on Instagram
‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे. हा सोहळा सुरु होताच स्पर्धक एक-एक करून घरात एन्ट्री घेणार आहेत.यंदा ढोल ताशाच्या गजरात सगळे स्पर्धक ‘बिग बॉस’च्या चक्रव्यूव्हात शिरणार आहेत. जे चांगले वागणार त्यांची रितेश देशमुख वाहवाह करणार. पण, जे वाईट वागणार त्यांच्यासोबत रितेश देशमुख कसा वागणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 28, 2024 08:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

