Bigg Boss Marathi Season 5: आर्या जाधवनंतर वैभव चव्हाण बिग बॉसच्या घराबाहेर; एकाच आठवड्यात दोन स्पर्धकांचा खेळ संपला

वैभव चव्हाण घरातून बाहेर पडला असून त्याचा बिग बॉसच्या घरातला प्रवास आता संपला आहे.

Photo Credit- X

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) यंदाच्या सीझनमध्ये मोठा ड्रामा पहायला मिळत आहे. टास्कदरम्यान निक्कीला कानाखाली लगावल्याने काल आर्याला बिग बॉसने घराबाहेर काढलं. त्यानंतर आज बिग बॉसच्या घरात या आठवड्यातील एलिमिनेशनची प्रक्रिया पार पडली. यात वैभव चव्हाणला (Vaibhav Chavan) बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं. या आठवड्यात वैभव चव्हाणसोबत आणखी पाच सदस्य नॉमिनेट होते. वैभव चव्हाण, आर्या जाधव, निक्की तांबोळी(Nikki Tamboli), अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर (Vasha Usgaonkar), अभिजीत सावंत(Abhijeet Sawant) हे सहा सदस्य नॉमिनेट होते.  (हेही वाचा: Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीच्या घरात आज रितेश भाऊ घेणार संग्राम चौगुलेची शाळा (Watch Promo))

नॉमिनेटेड सदस्यांपैकी वैभवला कमी मतं मिळाल्याने 50 व्या दिवशी वैभवचा बिग बॉसमधला खेळ संपला. त्यामुळे वैभव चव्हाण याला बिग बॉसच्या घरातून बाहेर जावं लागलं आहे. वैभवचा खास मित्र अरबाज पटेल याला अश्रू अनावर झाले. याशिवाय त्याची खास मैत्रीण जान्हवीलाही रडू कोसळले. एकूणच सर्व सदस्य भावूक झाले होते.

वैभवने अरबाज पटेलसोबत बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली होती. पुढे वैभवची अरबाज, जान्हवी, निक्कीसोबत चांगली मैत्री झाली. या चौघांचा A ग्रुप तयार झाला. तर दुसरीकडे वैभवची घरात वर्षा उसगांवकरांसोबत मोठी भांडणे झाली. वैभवने मोठ्या आवाजात वर्षा उसगांवकरांशी वाद घातला होता. याशिवाय आर्या आणि वैभवचेही खटके उडालेले दिसले. वैभव आणि इरिना यांचं नातं मैत्रीपलीकडे गेलेलं आपण पाहिलं.

वैभव चव्हाण बिग बॉसच्या घराबाहेर

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

निक्कीच्या कानशिलात लगावल्यामुळे आर्याने बिग बॉसच्या मूलभूत नियमाचं उल्लंघन केलं. त्यामुळे बिग बॉसने तिला घराबाहेर काढण्याची शिक्षा दिली. भाऊच्या धक्क्यावर अंतिम निर्णय घेताना बिग बॉसने म्हटलं की, 'कॅप्टन्सी कार्यातलं फुटेज वारंवार पाहिल्यानंतर लक्षात आलं की, आर्या निक्कीमध्ये धक्काबुक्की झाली. निक्कीचा आर्याला धक्का लागला आणि आर्याने हात उचलला. आर्याने केलंल कृत्य बिग बॉसच्या मुलभूत नियमांचं उल्लंघन. बिग बॉसच्या घरात या हिंसेचं समर्थन कधीच केलं जाणार नाही', असं म्हणत बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif