भूषण प्रधान चं ऐतिहासिक भूमिकेसाठी मुंडण; वेब सीरिजच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला (Watch Video)

यासाठी त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. चाफेकर बंधूंपैकी दामोदर चाफेकर यांच्या कार्याचा आढावा वेबसीरीजच्या माध्यमातून घेतला जाणार अहे. त्यामध्ये प्रमुख भूमिकेत भूषण प्रधान दिसणार आहे.

Bhushan Pradhan (Photo Credits: Instagram)

मराठी सिनेसृष्टीमध्ये हॉट अ‍ॅन्ड हॅन्डसम अभिनेत्यांपैकी एक भूषण प्रधान (Bhushan Pradhan) लवकरच ऐतिहासिक भूमिकांमधून रसिकांच्या भेटीला येणार आहे. मागील काही दिवसांपासून त्याने चाहत्यांना इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून संकेत दिले आहेत. त्याने केलेल्या पोस्टनुसार भूषण दामोदर चाफेकरांची (Damodar Chapekar) भूमिका साकरणार आहे. चाफेकरांच्या जन्मदिनी त्याने लिहलेल्या खास पोस्टमधून त्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र काल (27 जून) भूषणने दामोदर चाफेकरांच्या भूमिकेसाठी चक्क मुंडण केल्याचा व्हिडिओदेखील इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

भूषण प्रधानचा व्हिडिओ

भूषण प्रधानची नवी वेबसीरीज Zee 5 साठी असेल. सध्या Zee 5 वर महाराष्ट्र संयुक्त चळवळीची कहाणी सांगणारी 'हुतात्मा' ही सीरीज सुरू आहे. यापूर्वी भूषण प्रधान ' कॉफी आणि बरंच काही..' , टाईमपास अशा सिनेमातून रसिकाच्या भेटीला आला आहे.