Bhabi Ji Ghar Par Hai: 'भाभीजी घर पर है' फेम या अभिनेत्याच्या मुलाचे निधन, शेवटचा फोटो पाहून अंगावर येईल काटा, पाहा फोटो

टेलिव्हिजन जगतातील एक वाईट बातमी समोर आली आहे. टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'भाबी जी घर पर है' फेम अभिनेता जितू गुप्ता यांच्या मुलाचे निधन झाले आहे

ayush gupta

Bhabi Ji Ghar Par Hai:टेलिव्हिजन जगतातील  एक वाईट बातमी समोर आली आहे. टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'भाबी जी घर पर है' फेम अभिनेता जितू गुप्ता यांच्या मुलाचे निधन झाले आहे. जितू गुप्ता यांच्या मुलाचे नाव आयुष असून तो फक्त १९ वर्षांचा होता. या घटनेने जीतू गुप्ता यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि अभिनेत्यालाही मुलगा गमावल्याने धक्का बसला आहे. कॉमेडियन सुनील पाल यांनी आयुषच्या मृत्यूची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. सुनील पाल यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून आयुषच्या मृत्यूची दुःखद बातमी दिली आहे. यासोबत त्यांनी भावनिक पोस्टही शेअर केली आहे . आपल्या मित्राच्या मुलाच्या मृत्यूने त्यांना मोठा धक्का बसल्याचे या गोष्टीवरून स्पष्ट होत आहे. 

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Pal Comedian (@sunilpalcomedian)

 

आयुष गुप्ता बराच काळ रुग्णालयात दाखल होता आणि ही माहिती त्याचे वडील आणि अभिनेता जीतू गुप्ता यांनी सोशल मीडियावर दिली होती. त्यांनी त्यांच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

पाहा पोस्ट: 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jeetu Gupta Entertainer (@jeetu_gupta_09)

 

पाहा पोस्ट: 

पोस्ट केलेला फोटो पाहून आपण अंदाज लावू शकतो की आयुष गुप्ताची प्रकृती खूपच गंभीर होती.  त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मुलगा आयुषबद्दलची पोस्ट वाचल्यानंतर तुम्ही सर्वजण सतत फोन करून त्याची स्थिती विचारत आहात, पण मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की फक्त तुमचे आशीर्वाद द्या आणि देवाला प्रार्थना करा. यावेळी मी अजिबात बोलण्याच्या स्थितीत नाही आणि इतके कॉल उचलणे आणि सगळ्याशी बोलणे शक्य नाही......'

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement