Bajrang Dal Attack On The Set Aashram 3: आश्रम 3 सेटवर बजरंग दलाचा तूफान राडा, तर सेट वरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश झा यांच्या आगामी आश्रम ३ या वेबसीरिजच्या सेटवर तुफान राडा घातला. या प्रकरणात प्रकाश झा यांच्यावर शाही फेकत या सीरिजचा तीव्र निषेध केला.

Ban Aashram Trends On Twitter (Photo Credits: YouTube)

रविवारी भोपाळ (Bhopal) मध्ये बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी प्रकाश झा (Prakash Jha) यांच्या आगामी आश्रम ३ (Aashram3) या वेबसीरिजच्या सेटवर तुफान राडा घातला. या प्रकरणात प्रकाश झा यांच्यावर शाही फेकत या सीरिजचा तीव्र निषेद केला. तसेच सेटवर मोठ्या प्रमाणात तोडफोड़ हि करण्यात आली. एवढेच नसून सेटवरील कर्मचाऱ्यांचा पाठलाग करून त्यांना हि बेदम मारहाण करण्यात आली. ५ व्हॅनिटी व्हॅनचे हि नुकसान करण्यात आले. तसेच ५ कर्मचारी हि जखमी झाले अशी माहिती मिळत आहे. तर काही पत्रकारांना हि मारहाण करण्यात आली. या  सर्व प्रकरणावर प्रकाश झा यांनी पोलिसात तक्रार केली आहे. हे ही वाचा आसाममधील हिंदूंना Bajrang Dal ची धमकी; Christmas साजरा करण्यासाठी चर्चला भेट दिली तर मारहाण केली जाईल.

 

भोपाळच्या  जुन्या तुरुंगात (अरेरा हिल्स) आश्रम 3 या वेबसीरिजचं शूटींग सुरू होतं. शूटिंग चालू असताना रविवारी संध्याकाळी बजरंग दलाच्या सुमारे अडीचशे सदस्यांनी सेटवर राडा सुरु केला. प्रकाश झा मुर्दाबाद, बॉबी देओल (Bobby Deol) मुर्दाबाद अशा घोषणा देत हे कार्यकर्ते सेटवर आले आणि यांनी प्रकाश झा यांना बाहेर बोलवलं. यादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांची प्रकाश झा यांच्याशी बाचाबाची  झाली. यानंतर आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी व्हॅनिटी व्हॅन, कार, ट्रकमध्ये ठेवलेले  सामान, आवारात उभ्या असलेल्या मशिनरींची तोडफोड सुरू केली. सेटवरच्या कर्मचा-यांनी विरोध केल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली.

जरंग दलाचे प्रांतीय निमंत्रक सुशील यावेळी म्हणाले की, ‘प्रकाश झा यांनी आश्रम, आश्रम 2 बनवली. आता आश्रम 3 चे शूटींग सुरू आहे. आश्रमात एक गुरू महिलांचं लैंगिक शोषण करतोय, असं त्यांनी दाखवलं आहे. चर्च किंवा मदरश्यांमध्ये असं दाखवण्याची त्यांची हिंमत आहे का? ते स्वत:ला काय समजतात?  आम्ही बॉबी देओलला शोधतोय. त्याला त्याचा भाऊ सनी देओलकडून काही शिकायला हवं. त्यांनी वेबसीरिजचं नाव बदलावं अन्यथा आम्ही भोपाळमध्ये शूटींग होऊ देणार नाही.  आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी नाव बदलण्याचं आश्वासन दिलं आहे.  नाव बदललं नाही तर शूटिंगला परवानगी दिली जाणार नाही. इतकंच नाही तर ही वेबसीरिज प्रदर्शितही होऊ देणार नाही.’

 

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now