Elvish Yadav Granted Bail: एल्विश यादवला जामीन मंजूर; अटकेनंतर 5 दिवसांनी तुरुंगातून सुटका

एल्विश यादव गेल्या रविवारी तुरुंगात गेला होता.

Elvish Yadav (PC - Instagram)

Elvish Yadav Granted Bail: एल्विश यादव (Elvish Yadav) बाबत मोठी बातमी समोर येत आहे. एल्विश यादवला गौतम बुद्ध नगर जिल्हा न्यायालयातून जामीन मिळाला आहे. एल्विश यादव गेल्या रविवारी तुरुंगात गेला होता. दुसऱ्या दिवशी सोमवारी तो गौतम बुद्ध नगर न्यायालयात हजर होणार होता, मात्र त्यापूर्वीच वकील संपावर गेले. प्रदीर्घ संपानंतर शुक्रवारी सुनावणी झाली. ज्यामध्ये एल्विश यादवला जामीन मिळाला आहे. (वाचा - Elvish Yadav : एल्विश यादवला दिलासा! न्यायालयाने एनडीपीएसचे दोन कलम हटवले)

जिल्हा न्यायालयाने दिला दिलासा -

गुरुवारीही एल्विश यादवच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. पोलिसांनी कलमे वाढवल्याने हा प्रकार घडला. त्यावर सुनावणीसाठी न्यायालयाने शुक्रवारची तारीख निश्चित केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचे एल्विशचे वकील दीपक भाटी यांनी सांगितले होते. (हेही वाचा - Elvish Yadav case: एल्विश यादव प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक, दोघेही हरियाणाचे रहिवासी)

तथापी, काही दिवसांपूर्वी एका युट्युबरवरून त्यांच्यात भांडण झाले होते. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागला आहे. या प्रकरणातही एल्विश यादवची गुरुग्राम न्यायालयात 27 मार्च रोजी हजेरी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साप तस्करी प्रकरणी सेक्टर-20 पोलिस स्टेशनने रविवारी एल्विश यादवला अटक केली होती. जिथे डीसीपी, एसीपी आणि स्टेशन प्रभारी यांनी एल्विश यादवची चौकशी केली.