Ananya Panday Shares Picture with Shah Rukh Khan: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही खास छायाचित्रे शेअर केली आहेत. दरम्यान, अनन्याने नुकत्याच केलेल्या फोटोशूटचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.या फोटोंमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला फोटो म्हणजे अनन्या पांडे आणि शाहरुख खानचा फोटो, दोघेही फोटोसाठी पोज देतांना दिसत आहे. सोबत पोज देताना दिसत आहे, अनन्याने गोल्डन आउटफिट घातला आहे, जो खूपच स्टायलिश दिसत आहे. हलका मेकअप आणि खास स्टाइलमध्ये बांधलेले केस यामुळे अनन्या पांडेचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. दरम्यान, शाहरुख खान काळ्या रंगाच्या सूटमध्ये नेहमीप्रमाणेच देखणा दिसत आहे. इतर फोटोंमध्ये, अनन्या एकटीच पोज देताना दिसत आहे, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक स्पष्टपणे दिसत आहे. हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 5: वर्षा उसगावकर यांना पाहून अनिल थत्ते यांना तारुण्य आठवले; अभिजित बिचुकले, राखी सावंत प्रकटले, स्पर्धकांचे कान उपटले
येथे पाहा, अनन्या पांडे आणि शाहरुख खानचा खास फोटोशूट
View this post on Instagram
अनन्या पांडेने शाहरुख खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ही सर्व छायाचित्रे नुकत्याच झालेल्या आयफा अवॉर्ड्स मधील आहेत, जिथे अनेक बॉलीवूड स्टार्स त्यांच्या जबरदस्त लुक्सने मेळाव्याला आणखी खुलावतांना दिसले. अनन्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून तसेच सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि हे फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत.