अमिताभ बच्चन ठरले 2018-19 मध्ये सर्वाधिक कर भरणारे कलाकार; जाणून घ्या एकूण किती कोटी भरले

बॉलीवूडच्या कोणत्याही कलाकाराकडून भरला गेलेला हा सर्वाधिक कर आहे.

Amitabh Bachchan (Photo Credit: Twitter)

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), बॉलीवूडचे शेहनशहा वयाची 75 वर्षे पार करूनही आजही चित्रपट, जाहिराती, शो अशा अनेक गोष्टी करताना दिसतात. एकेकाळी बॉलीवूडचे आघाडीचे नायक आणि सर्वात जास्त मानधन घेणारा नट, अशी ओळख ठरलेले अमिताभ यांचा इनकम आजच्या घडीला कितीतरी पटींनी वाढलेला आहे. अमिताभ बच्चन यांनी 2018 -19 च्या आर्थिक वर्षासाठी तब्बल 70 कोटी रुपयांचा इनकम टॅक्स भरला आहे. बॉलीवूडच्या कोणत्याही कलाकाराकडून भरला गेलेला हा सर्वाधिक कर आहे.

आज इंडस्ट्रीमधील एक दर्यादिल माणूस म्हणूनही अमिताभ बच्चन यांचे नाव घेतले जाते. बिहारमधील मुजफ्फरपूरच्या दोन हजार शेतकऱ्याचे कर्ज त्यांनी भरले. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या प्रत्येक जवानांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत केली. नुकताच त्यांचा बदला हा चित्रपट प्रदर्शित झाला. 10 कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने जगभरातून 100 कोटी पेक्षा जास्त व्यवसाय केला. आता अमिताभ हे ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसणार आहेत. (हेही वाचा: अमिताभ बच्चन यांच्याकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत)

बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त कर भरणाऱ्या व्यक्तींमध्ये सलमान खान, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, आलिया भट्ट, करण जोहर या व्यक्तींचा समावेश होतो.