बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना मुंबई येथील नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज
मुंबई येथील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे जेष्ठ अभिनेता अमिताभ (Amitabh Bachchan) बच्चन यांची प्रकृती ढासळ्यामुळे मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबई येथील नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यावेळी त्यांची पत्नी जया बच्चन आणि अभिषेक बच्चन दोघेही उपस्थित होते. लिव्हरच्या रात्रामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती समोर आली होती. सध्या अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते घरी परतले आहेत.
अमिताभ बच्चन यांची प्रकृती ढासळल्यामुळे 15 ऑक्टोबरला रात्री 2 वाजता त्यांना नानावटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर बच्चन यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना लिव्हरचा त्रास असल्याची माहिती मिळाली होती. तसेच त्यांना स्पेशल केबिन मध्ये ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर नातेवाईकांशिवाय इतर कोणालाही त्यांची भेट घेण्यास मुभा नव्हती. आज ३ दिवसानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन यांच्यासोबत ए्याक छायाचित्र काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे अमिताभ यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- बॉलिवुड स्टार सलमान खानच्या बॉडिगार्ड ‘शेरा’चा शिवसेनेत प्रवेश
एएनआय ट्विट-
अमिताभ यांच्यावर १९८२ सालापासून उपचार सुरु आहेत. अमिताभ बच्चन यांना कुली सिनेमाच्या शुटींग दरम्यान दुखापत झाली होती. त्यावेळी तब्बल २ महिने अमिताभ यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.