बॉलिवुड स्टार सलमान खानच्या बॉडिगार्ड ‘शेरा’चा शिवसेनेत प्रवेश

बॉलिवुडचा स्टार सलमान खानचा विश्वासू बॉडिगार्ड गुरमीत सिंग उर्फ ‘शेरा’ याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. शेराने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्रीवर शिवबंधन बांधले.

बॉलिवुड स्टार सलमान खानच्या बॉडिगार्ड ‘शेरा’चा शिवसेनेत प्रवेश
Salman Khan bodyguard Shera joined Shiv Sena ( Photo Credit - ANI)

बॉलिवुडचा स्टार सलमान खानचा (Salman Khan) विश्वासू बॉडिगार्ड (Bodyguard) गुरमीत सिंग उर्फ ‘शेरा’ (Shera) याने शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे. शेराने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थित मातोश्रीवर शिवबंधन बांधले. तसेच शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेराच्या हाती शिवबंधन बांधत पक्षात स्वागत केलं. शुक्रवारी रात्री शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती देण्यात आली. विधानसभा निवडणुकीला अगदी दोन दिवस शिल्लक राहिले असताना शेराने शिवसेनेत प्रवेश केला असल्याने सर्वत्र याची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा - बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान 2020 पर्यंत देशभरात सुरु करणार 300 जिम

शेरा हा सलमान खानचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू अंगरक्षक आहे. शेरा गेल्या २२ वर्षांपासून सलमान खानचा बॉडिगार्ड म्हणून काम करत आहे. शनिवारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार थांबणार आहे. त्यामुळे शेरा आज (शनिवारी) शिवसेनेचा प्रचार करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2019 08:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).