Mumbai Diaries 26/11 Teaser: मुंबई दहशतावादी हल्ल्यातील डॉक्टरांचे शौर्य दाखवणाऱ्या वेबसिरीजचा टीझर प्रदर्शित (Watch Video)

यात अनेक पोलिस शहीद झाले तर निष्पाप नागरिकांचा बळी गेला. आज या घटनेला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. या घटनेवर आधारीत अॅमेझॉन प्राईमची नवी वेबसिरीज मुंबई डायरीज 26/11 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Mumbai Diaries 26/11 (Photo Credits: YouTube)

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला (Mumbai Terror Attack) झाला. यात अनेक पोलिस शहीद झाले तर निष्पाप नागरिकांचा बळी गेला. आज या घटनेला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. या घटनेवर आधारीत अॅमेझॉन प्राईमची नवी वेबसिरीज मुंबई डायरीज 26/11 (Mumbai Diaries 26/11) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसिरीजचा पहिला टीझर (Teaser) युट्युबवर (Youtube) रिलीज झाला आहे. मार्च 2021 मध्ये ही वेबसिरीज रिलीज होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने या वेबसिरीजचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 26/11 च्या भयानक रात्री हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनांवर आधारीत ही वेबसिरीज आहे. त्याचप्रमाणे त्या दिवशी तैनात असलेले पोलिस, पत्रकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बचावली. ते देखील या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळेल.

या वेबसिरीजच्या संपूर्ण कास्टची अद्याप घोषणा झालेली नाही. परंतु, टीझर पाहून अभिनेता मोहित रैना मुख्य भूमिकेत असल्याचे दिसत आहे. यात मोहित रैना एका डॉक्टराच्या भूमिकेत जखमींवर उपचार करताना दिसत आहे. ही वेबसिरीज निखिल आडवाणी यांची निर्मित असून यामध्ये कोंकणा सेन शर्मा, टिना देसाई, श्रेया धनवंतरी यांसारखे कलाकार आहेत.

पहा टीझर:

दरम्यान, 26/11 च्या रात्री आपण कुठे होतो, याची मुंंबईकर सतत चर्चा करत असतात. या घटनेवर आधारित विविध सिनेमे आणि टीव्ही शोज रिलीज झाले असले तरी अद्याप डॉक्टरांची बाजू कोणीही प्रेक्षकांसमोर मांडलेली नाही. या वेब सिरीज मधून त्या भयानक रात्री डॉक्टरांनी दाखवलेल्या शौर्याचा उलघडा होणार आहे, अशी माहिती निखिल आडवाणी यांनी दिली.

अॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या इंडिया ओरीजनल्सच्या हेड अर्पणा पुरोहित म्हणाल्या की, "26/11 च्या रात्री मुंबईमध्ये झालेला भयानक हल्ला प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात आहे. मुंबई डायरीज 26/11 ही वेबसिरीज सर्व डॉक्टर्स, पोलिस आणि पत्रकार ज्यांनी या लढ्यात आपल्या जीवाची बाजी लावली त्यांना समर्पित करण्यात येत आहे." तसंच मुंबईच्या स्पिरीटचे दर्शन यातून घडते. देशातील एका चांगल्या दिग्दर्शकासोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे, असेही त्या म्हणाल्या.