Allu Arjun Donates 25 Lakhs: वायनाड भूस्खलनग्रस्तांना अल्लू अर्जुनचा मदतीचा हात, भावूक पोस्ट लिहित 25 लाख रुपयांची मदत जाहीर

अभिनेता अल्लू अर्जुनने वायनाडमध्ये झालेल्या आपत्तीग्रस्तांना 25 लाख रुपयांची मदत केली आहे. वाडनाड येथे झालेल्या भूस्खलनातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 375 जणांचा मृत्यू झाला आहे.

Photo Credit- X

Allu Arjun Donates 25 Lakhs: केरळ राज्यात मुसळधार पावसामुळे मोठी जीवितहानी झाली. वाडनाड(Wayanad Landslide) येथे झालेल्या भूस्खलनातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 375 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ, लष्कराचे जवान, स्थानिक पोलिसांकडून अजूनही बचावकार्य वेगाने सुरू आहे. अपघातग्रस्तांना सरकारकडून मदतीचा हात देण्यात येत आहे. त्याताच आता मदतगारांच्या या यादीमध्ये टॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश झाला आहे. अभिनेता अल्लू अर्जुनने(Allu Arjun ) वायनाडमध्ये झालेल्या आपत्तीग्रस्तांना 25 लाख रुपयांची मदत केली आहे. (हेही वाचा: Wayanad Landslide Death Toll: वायनाडमध्ये भूस्खलनात मोठी जीवितहानी; मृतांचा आकडा 358 वर, बेपत्ता नागरिकांचा रडारच्या मदतीने शोध)

अभिनेता अल्लू अर्जुन आधी टॉलिवूड सेलिब्रिटी नयनतारा, तिचा पती विघ्नेश शिवन, मोहनलाल, मोहनलाल यांनी आपत्तीग्रस्तांसाठी लाखो रुपयांची देणगी दिली आहे. आता या यादीत अभिनेता अल्लू अर्जुनचाही समावेश झाला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित 'एक हात मदतीचा' दिला आहे. शिवाय अल्लू अर्जुनने भूस्खलनाच्या घटनेबाबत दु:खही व्यक्त केले आहे.(हेही वाचा:Rahul Gandhi Wayanad Visit: केरळने एवढा भीषण विध्वंस पाहिला नाही; वायनाड भूस्खलनावर राहुल गांधीची प्रतिक्रीया )

शेअर केलेल्या पोस्टमध्ये अल्लू अर्जुनने लिहिलंय की, "वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे मला खूप दु:ख झालं आहे. केरळ राज्यातील नागरिकांनी माझ्यावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव केला आहे. मला केरळच्या सीएम रिलीफ फंडात पुनर्निर्माणाच्या निधीमध्ये २५ लाख रुपये देणगी देऊन योगदान द्यायचे आहे. तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि सामर्थ्यासाठी प्रार्थना."

त्यासोबतच तात्काळ मदत आणि पुनर्निर्माणाच्या प्रयत्नांसाठी अभिनेता मोहनलालने ३ कोटींची घोषणा केली. त्यासोबतच त्यांनी बाधित भागाला भेट देऊन त्याची झलक सोशल मीडियावरही दाखवली. वायनाडमधील मदत निधीसाठी टॉलिवूड अभिनेत्री नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांनी २० लाख रुपयांची देणगी दिली होती. वायनाडमध्ये सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. यापूर्वी ही अनेक टॉलिवूड सेलिब्रिटींनी मदत केली आहे.

पोस्ट पहा

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

अभिनेता अल्लू अर्जुनबद्दल सांगायचं तर, अल्लू अर्जुनचा मोस्ट अवेटेड 'पुष्पा २' चित्रपट यावर्षी ६ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही मुख्य भूमिकेत आहे. तर फहद फाझिल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी, 'पुष्पा २'च्या सेटवरील क्लायमॅक्स फाईट सीनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ काही कलाकार आणि क्रू मेंबर्सने सीन शूट केला होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now