रोहित शेट्टीच्या पोलिसी जगात झालीये नवी एन्ट्री; अक्षय कुमार साकारणार ATS प्रमुख 'सूर्यवंशी'ची भूमिका

अक्षय कुमार लवकरच दहशतवादविरोधी पथकातील अधिकारी सूर्यवंशीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. रोहित शेट्टीच्या पोलिसी जगातली ही नवीन एन्ट्री असणार आहे.

Akshay Kumar's First Look | (Picture Credit: Instagram)

रोहित शेट्टीने त्याच्या आगामी सूर्यवंशी  (Sooryavanshi)  चित्रपटाचा नायक अक्षय कुमारचा (Akshay Kumar) वर्दीमधला फर्स्ट लुक नुकताच सोशल मीडियावर शेयर केला. त्याच्या पोलिसी जगातल्या पात्रांमधली ही नवी एन्ट्री असणार आहे. या फोटोत रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अजय देवगण (Ajay Devgan) सुद्धा दिसत आहेत. या चित्रपट अक्षय कुमार दहशतवाद विरोधी पथकातील सूर्यवंशी नावाच्या एका अधिकाऱ्याची भूमिका करत आहे.

खरं तर खिलाडी कुमारच्या या भूमिकेची पहिली झलक मागच्या वर्षी आलेल्या सिम्बा  या चित्रपटाच्या शेवटच्या सिनमध्येच बघायला मिळाली होती. तसेच त्या चित्रपटात अजय देवगणच्या सिंघमचाही छोटासा रोल होता. आता सूर्यवंशीमध्ये सिम्बा आणि सिंघम दोघेही पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत असल्याचे म्हटले जात आहे. हॉलिवूडमधल्या 'मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स' प्रमाणेच रोहित शेट्टीचे हे 'पोलिसी जग' प्रेक्षकांना भावते की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

 

 

View this post on Instagram

 

Experience the MASS EUPHORIA...27th March 2020 🔥🔥🔥 #sooryavanshi @ajaydevgn @akshaykumar @ranveersingh @katrinakaif @karanjohar @reliance.entertainment @rohitshettypicturez @dharmamovies #CapeOfGoodFilms

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty) on

या चित्रपटात अक्षय कुमारसोबतच कतरीना कैफही (Katrina Kaif) मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 27 मार्चला प्रदर्शित होईल. तर दुसरीकडे, 25 ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षयचा हाऊसफुल 4 (Housefull 4) हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Pakistan vs West Indies, 1st Test Day 2 Stumps Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, दुसऱ्या डावात पाकिस्तानने तीन विकेट गमावून 109 धावा केल्या आणि घेतली 202 धावांची आघाडी

Pakistan vs West Indies, 1st Test Day 1 Stumps Scorecard: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, पाकिस्तानने चार विकेट गमावून 143 धावा केल्या, सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी अर्धशतके झळकावली

Who Is Priya Saroj? प्रिया सरोज कोण आहे? वय, संपत्ती आणि राजकीय पार्श्वभूमी, समाजवादी पक्षाच्या खासदाराबद्दल सर्व काही घ्या जाणून, रिंकू सिंहसोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे वृत्त

Saif Ali Khan Attack Case: रक्ताने माखलेल्या सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणाऱ्या ऑटो ड्रायव्हरने सांगितली संपूर्ण कहाणी; नेमक काय घडलं? जाणून घ्या

Share Now