मुकेश अंबानी यांच्यानंतर 'ही' महागडी कार अजय देवगण याच्याकडे, किंमत पाहून थक्क व्हाल!

त्याने आतापर्यंत अनेक खास आणि महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. या गाड्यांच्या लिस्टमध्ये त्याने आणखी एका महागड्या गाडीचा समावेश झाला आहे. आता अजयने Rolls Royce Cullinan ही जगातील सर्वात महागडी आलिशान कार खरेदी केली आहे. भारतात आतापर्यंत ही महागडी कार केवळ दोन श्रीमंत व्यक्तींकडेच आहेत. Rolls Royce Cullinan खरेदी करणारा अजय हा भारतातला तिसरा व्यक्ती बनला आहे.

ajay devgan and Rolls Royce car

 

बॉलिवूड (Bollywood)  अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) हा स्पोर्ट गाड्यांचा मोठा चाहता आहे. त्याने आतापर्यंत अनेक खास आणि महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. या गाड्यांच्या लिस्टमध्ये त्याने आणखी एका महागड्या गाडीचा समावेश झाला आहे. आता अजयने Rolls Royce Cullinan ही जगातील सर्वात महागडी आलिशान कार खरेदी केली आहे. भारतात आतापर्यंत ही महागडी कार केवळ दोन श्रीमंत व्यक्तींकडेच आहेत. Rolls Royce Cullinan खरेदी करणारा अजय हा भारतातला तिसरा व्यक्ती बनला आहे.

अजय देवगण हा अनेक चित्रपटात निरनिराळ्या गाड्यासह अनेकदा दिसला आहे. परंतु खऱ्या आयुष्यातही अजयला स्पोर्ट्स गाड्यांची आवड असल्याचे समजते आहे. सध्या अजयने खरेदी केलेली एसयूव्ही Rolls Royce Cullinan कारची किंमत ७ कोटीपर्यंत आहे. भारतात ही कार केवळ मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि टी-सीरिजचे भूषण कुमार (Bhushan Kumar)  यांच्याजवळ आहे. यांच्या यादीत अजय देवगणचा समावेश झाला आहे. अजयकडे ऑडी (Audi car), बीएमडब्ल्यू (BMW), मर्सडिज् (Mercedes), लँड रोवर (Land Rover),वॉल्वोसारख्या (Volvo) अनेक महागड्यांचे कलेक्शन केले आहे. हे देखील वाचा-रानू मंडल यांची 10 वर्षांनी पोटच्या मुलीशी भेट, मायलेकींचा हसरा फोटो सोशल मीडियात व्हायरल (See Photo)

अजय हा सध्या आपल्या विविध चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. अजय लवकर तुर्रम खान, तानाजी द अनसंग वॉरिअर, मैदान, भुज द प्राईड ऑफ इंडिया आणि RRR या चित्रपटात मुख्य भूमिका साकरताना दिसणार आहे.