Stree च्या अ'भूत'पूर्व यशानंतर Rajkummar Rao आणि Shraddha Kapoor पुन्हा येणार एकत्र
चित्रपटाची कथा अशा ठिकाणी येऊन संपवली होती की सिक्वल येणार हे निश्चित होतं. पण श्रद्धा आणि राजकुमार हे स्त्री च्या सिक्वल साठी एकत्र येत नसून निर्माता दिनेश विजानने त्याच्या दुसऱ्या एका चित्रपटासाठी दोघांना निश्चित केले आहे.
गेल्या वर्षी आलेल्या स्त्री चित्रपटाने सर्वांना हादरवून सोडलं. चित्रपटाची कथा अशा ठिकाणी येऊन संपवली होती की सिक्वल येणार हे निश्चित होतं. पण श्रद्धा आणि राजकुमार हे स्त्री च्या सिक्वल साठी एकत्र येत नसून निर्माता दिनेश विजानने त्याच्या दुसऱ्या एका चित्रपटासाठी दोघांना निश्चित केले आहे.
दिनेश विजान आणि स्त्री ची दिग्दर्शक द्वयी राज आणि डीके यांच्यामध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रचंड वाद झाले. वादाचा मूळ मुद्दा हा मिळकतीचे वितरण कसे करायचे हा होता. खरं तर त्या तिघांपैकी कोणालाही स्त्री 100 कोटींचा आकडा पार करेल याची कल्पना नव्ह्ती आणि त्यामुळेच वादाला सुरवात झाली. त्यामुळे 'स्त्री 2' रखडला आहे. वास्तविक चित्रपटाच्या यशाबद्दल खात्री असल्या कारणाने दुसऱ्या भागाची कथासुद्धा तयार होती. (हेही वाचा. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने बॉडीगार्ड अतुल कांबळेसाठी मराठीतून लिहिली पोस्ट)
पण दिनेश विजान कडे दुसऱ्या एका चित्रपटाची कल्पना होती. ती त्याने श्रद्धा आणि राजकुमारला ऐकवली. जी त्यांना पसंत पडली आणि आता त्यांनी होकार सुद्धा कळवला आहे.पुढच्या वर्षी या चित्रपटाला सुरवात केली जाईल. श्रद्धा कपूरला काही दिवसांपूर्वी 'भूल भुलैया 2' साठी विचारणा करण्यात आली होती. पण हा चित्रपट आधी स्वीकारल्यामुळे तिने भूल भुलैया 2 ला नकार दिला.