या '६' अभिनेत्रींनी लग्नानंतर बॉलिवूडला रामराम ठोकला !

करिअर उत्तम सुरु असताना त्यांनी लग्नानंतर बॉलिवूडला रामराम ठोकला.

सोनाली बेंद्रे, ट्विंकल खन्ना (फाईल फोटो)

बॉलिवूडमध्ये करिअर करुन टॉप अभिनेत्री होण्याचे प्रत्येक नवोदीत अभिनेत्रीचे स्वप्न असते. पण प्रत्येकीला मनाप्रमाणे यश मिळतेच असे नाही. पण अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांनी करिअर उत्तम सुरु असताना लग्नानंतर बॉलिवूडला रामराम ठोकला. पाहुया कोण आहेत त्या अभिनेत्री...

असिन

साऊथच्या असिनने गजनी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. हा सिनेमा हिट ठरला आणि त्यानंतर तिने अनेक सिनेमात काम केले. पण २०१६ मध्ये मायक्रोमॅक्स कंपनीचे को-फाऊंडर राहुल शर्मासोबत विवाहबद्ध झाली. त्यानंतर तिने बॉलिवूडपासून दूर राहणेच पसंत केले. २०१५ मध्ये आलेला 'ऑल इज वेल' हा तिचा शेवटचा सिनेमा होता.

नम्रता शिरोडकर

नम्रता शिरोडकर या मराठमोठ्या अभिनेत्रीचाही या यादीत समावेश आहे. साऊथचा सुपरस्टार महेश बाबूसोबत लग्न केल्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम ठोकला. त्यापूर्वी तिने २००४ मध्ये आलेल्या 'रोक सको तो रोक' या सिनेमात काम केले होते.

मंदाकिनी

बॉलिवूडची सौंदर्यवती मंदाकिनी हिने देखील सिनेसृष्टीला लवकरच अलविदा केले. लग्नानंतर ती सिनेमांमध्ये परतलीच नाही. १९८५ मध्ये तिचा शेवटचा सिनेमा आला होता. त्यानंतर तिने तिबेटीयन योगा क्लासेस सुरु केले.

सोनाली बेंद्रे

९० च्या दशकातील हिट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सोनाली कुलकर्णी. २००२ मध्ये गोल्डी बहलसोबत लग्न केल्यानंतर तिने सिनेमांपासून दूर राहणेच पसंत केले. २०१३ मध्ये आलेल्या 'वन्स अपोन ए टाईम इन मुंबई दोबारा' या सिनेमात तिने एक लहानशी भूमिका साकारली होती. मात्र छोट्या पडद्यावर ती चांगलीच सक्रिय होती.

ट्विंकल खन्ना

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री ट्विंकल खन्ना सिनेमांत परत फिरकलीच नाही. २००१ मध्ये आलेली 'लव के लिए कुछ भी करेगा' हा तिचा शेवटचा सिनेमा होता.

गायत्री जोशी

स्वदेस सिनेमात शाहरुख खानसोबत झळकलेली गोड चेहऱ्याची अभिनेत्री गायत्री जोशी. चांगला अभिनय आणि सौंदर्य असूनही तिने लग्नानंतर सिनेमात करणे बंद केले. २००५ मध्ये तिने ऑबेरॉय कन्स्ट्रकशनच्या विकास ऑबेरॉयसोबत लग्न केले.