Actress Bidisha De Majumdar Dead: 21 वर्षीय बंगाली अभिनेत्रीची आत्महत्या, घटनास्थळावरून सुसाईड नोटही जप्त
21 वर्षीय अभिनेत्री बिदिशाचा मृतदेह बुधवारी तिच्या फ्लॅटवर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. बिदिशा डमडमच्या नगरबाजारमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती आणि तिथे तिने आत्महत्या केली.
सिनेसृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय बंगाली अभिनेत्री आणि मॉडेल बिदिशा दे मजुमदार (Bidisha De Majumdar) हिने आत्महत्या केली आहे. ही बातमी समोर आल्यापासून बंगाली चित्रपटसृष्टीला धक्का बसला असुन या अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली जात आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, 21 वर्षीय अभिनेत्री बिदिशाचा मृतदेह बुधवारी तिच्या फ्लॅटवर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. बिदिशा डमडमच्या नगरबाजारमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती आणि तिथे तिने आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले जेथे दरवाजा तोडून अभिनेत्रीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
पोलिसांना घटनास्थळावरून मिळाली सुसाईट नोट
पोलिसांनी घटनास्थळावरून बिदिशा दे मजुमदारची सुसाईड नोटही जप्त केली आहे ज्यामध्ये तिने स्वतःला कॅन्सरने पीडित असल्याचे सांगितले आहे. बिदिशा काही महिन्यांपूर्वी नगरबाजारमध्ये राहू लागली. अभिनेत्रीच्या मित्रांनुसार, बिदिशाने 2019 मध्ये फ्रीलान्स मॉडेलिंग सुरू केले आणि ती नगरबाजार अपार्टमेंटमध्ये एकटीच राहायची. मात्र, काही लोक म्हणतात की बिदिशा खूप दिवसांपासून त्रस्त होती आणि तिच्या मैत्रिणींनाही सांगायची की जर काही बदललं नाही तर ती आपलं आयुष्य संपवेल. (हे देखील वाचा: महेश बाबूचा बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ, 'सरकारू वारी पाटा' 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील)
Tweet
खून आणि आत्महत्या रहस्य
मित्रांनी हे देखील उघड केले आहे की अभिनेत्री एका जिम ट्रेनरसोबत रिलेशनशिपमध्ये होती जो तिची फसवणूक करत होता. प्रियकर एकाच वेळी तीन मुलींना डेट करत होता, ज्याची माहिती बिदिशाला आली. बिदिशाला तिचा बॉयफ्रेंड कोणाशीही शेअर करायचा नव्हता, त्यामुळे ती खूप नाराज होती. सुसाईड नोटमधील ती कॅन्सरने ग्रस्त असल्याचे वक्तव्य पूर्णपणे खोटे असल्याचे अभिनेत्रीच्या मित्रांचे म्हणणे आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)