Yamaha Fascino चे नवे मॉडेल लॉन्च, किंमत 60 हजार रुपयांपेक्षा कमी
Yamaha Motor India कंपनीने त्यांचे नवे मॉडेल असलेले Fascino चे Dark Knight Edition भारतात लॉन्च केले आहे.
Yamaha Motor India कंपनीने त्यांचे नवे मॉडेल असलेले Fascino चे Dark Knight Edition भारतात लॉन्च केले आहे. यामाहा कंपनीने फसिनो डार्कनाइट या बाईकची किंमत 56.793 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचसोबत मरुन रंगाची सीट दिली आहे.
नवीन कलर स्कीम व्यतिरिक्त Fascino Dark Knight अॅडिशन मध्ये यूनिफाइड ब्रेकिंग सिस्टम (UBS) देण्यात आले आहे. त्याचसोबत यामध्ये मेनटेनेंस फ्री बॅटरी दिली आहे. या नव्या फीचर्ससह अन्य जुने फीचर्स जसेच्या तसे ठेवण्यात आले आहेत. परफॉर्मेंसबद्दल बोलायचे झाले तर, 113 पॉवरसाठी 113 सीसी, ब्लू कोर, एअर कूल्ड, 4-स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिनची सोय करण्यात आली आहे. त्याचसोबत 7bhp ची कमीतकमी पॉवर आणि 8.1Nm पीक टॉर्क जनरेट करु शकणार आहे. याचे इंजिन CVT गियरबॉक्सपेक्षा कमी आहे. तसेच इलेक्ट्रिक आणि किक स्टार्टसुद्धा देण्यात आले आहे.(हेही वाचा-CFMoto 650 MT बाईक टेस्टिंग दरम्यान भारतात दिसली, जाणून घ्या किंमत आणि खासियत)
डार्कनाइट या अॅडिशन व्यतिरिक्त भारतात या बाईकसाठी 6 रंग उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामध्ये ग्रीन, ग्लॅमरस गोल्ड, डेपर ब्लू, बीमिंग ब्लू, डॅजलिंग ग्रे आणि सॅसी क्यान असे रंगामध्ये ही बाईक ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर दिल्ली शोरुम मध्ये या बाईकसाठी 55,293 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे.