Volkswagen Nivus Coupe SUV लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि खासियत

Volkswagen ने ब्राझील मध्ये गेल्या काही काळापासून प्रतिक्षेत असलेली Volkswagen Nivus Coupe SUV लॉन्च करण्यात आली आहे. याच्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, Coupe SUV ची सुरुवाती किंमत $85,890 डॉलर्स म्हणजेच भारतीय बाजारात याची किंमत जवळजवळ 12 लाख रुपये आहे.

Volkswagen Nivus (Photo Credits-Twitter)

Volkswagen ने ब्राझील मध्ये गेल्या काही काळापासून प्रतिक्षेत असलेली Volkswagen Nivus Coupe SUV लॉन्च करण्यात आली आहे. याच्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, Coupe SUV ची सुरुवाती किंमत $85,890 डॉलर्स म्हणजेच भारतीय बाजारात याची किंमत जवळजवळ 12 लाख रुपये आहे. कार निर्माता कंपनीने नव्या Nivus ही दोन वेरियंट म्हणजेच Comfortline 200 TSI आणि Highline 200 TSI मध्ये उतरवली आहे. Highline वेरियंटची किंमत $98,290 म्हणजे भारतीय बाजारात याची किंमत 13.8 लाख रुपये आहे.

ब्राझीलच्या मार्केटमध्ये Nivis Coupe SUV ही Polo आणि T-Cross दरम्यान ठेवण्यात येणार आहे. यामध्ये ब्लॅकेंड रुफ आणि ORVMs, 17 इंचाचा डार्क अलॉय व्हिल आणि दोन कलर ऑप्शन- सनसेट रेड आणि मूनस्टोन ग्रे मध्ये उपलब्ध असणार आहे. नव्या Nivus Coupe SUV कंपनीच्या MQB A0 प्लॅफॉर्म बेस्ड आहे. या एसयुव्ही मध्ये बोल्ड ग्रिल, रिस्टाइल LED हेडलँम्प, इंटीग्रेटेड DRLs, नवी वर्टिकल-स्टेक्ड फॉग लँम्प, ब्लॅक्ड आउट ग्रिल आणि बंपर देण्यात आले आहेत. LED टेललाइटसह ही एसयुवी स्पोर्टी लूक मध्ये दिसून येते. या एसयुवीच्या टॉप अॅन्ड मॉडलेमध्ये 17 इंचाचे व्हिल दिले आहेत. (Renault ने बंद केली दमदार लूक असणारी SUV, कंपनीने वेबसाईट्सवरुन सुद्धा हटवली)

डायमेंशन बाबत बोलायचे झाल्यास, VolksWagen Nivus ची लांबी 4266 mm आणि रुंदी 1757 mm, उंची 1493 mm आणि व्हिलबेस 2566 mm आहे. कलर ऑप्शन मध्ये ही एसयुवी Moonstone Gray, Sirius Silver, Crystal White, Ninja Black, Platinum Gray आणि Sunset Red  मध्ये कंपनीने उपलब्ध करुन दिली आहे.(पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त? भारतातील 'या' दमदार CNG कारबाबत जरुर जाणून घ्या)

फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास Volkswagen Nivus मध्ये 10 इंचाचा इंफोन्टेंटमेंट सिस्टम दिला आहे. जो अॅन्ड्रॉइड आणि अॅपल कारप्लेला सपोर्ट करणार असून 10 GB इंटरनल मेमोरी दिली आहे. रिवर्स कॅमेरा, 10.25 इंचाचा डिजिटल इंस्ट्र्युमेंट कंसोल, 6 एअरबॅग्स, ट्रॅक्शन आणि स्टेबिलिटी कंट्रोल, एडेप्टिव्ह क्रूज कंट्रोल, ऑटोमेटिक ब्रेकिंग, ऑल डिस्क ब्रेक, फेटिक डिटेक्टर, एलईडी फॉग लँम्प, बीट्स प्रीमियम साउंट सिस्टमसह सबवुफर सुद्धा देण्यात आले आहे.

पॉवर आणि स्पेसिफिकेशनसाठी Volkswagen Coupe SUV मध्ये 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 128bhp ची पॉवर आणि 200Nm चे टॉर्क जनरेट करतो. ट्रान्समिशन बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये इंजिन 6 स्पीड टॉर्क कंन्वर्टर ऑटोमेटिक गिअरबॉक्स पेक्षा कमी आहे. स्पीड संदर्भात कंपनीने एसयुवी 189 kmph च्या स्पीडने धावणार आह. ही एसयुवी जवळजवळ 10 सेंकंदात 0-100kmph च्या स्पीड पकडू शकते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now