Tesla Warehouse In Kurla: एलोन मस्कच्या टेस्लाने मुंबईच्या कुर्ल्यात भाड्याने घेतले 24,565 चौरस फूट गोदाम; 5 वर्षांसाठी झाला करार, जाणून घ्या किती मोजली किंमत
भाड्याव्यतिरिक्त, टेस्ला संपूर्ण भाडेपट्टा कालावधीत कॉमन एरिया देखभाल शुल्कासाठी, 1.62 कोटी रुपये देण्यास जबाबदार आहे आणि 2.25 कोटी रुपयांची सुरक्षा ठेव भरली आहे.
एलोन मस्कच्या (Elon Musk) टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने (Tesla India Motor and Energy Pvt Ltd), मुंबईतील कुर्ला (Kurla) येथील लोढा लॉजिस्टिक्स पार्क येथे 24,565 चौरस फूट गोदामाची जागा भाड्याने घेतली आहे. सीआरई मॅट्रिक्सने पुनरावलोकन केलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, हा करार पाच वर्षांचा आहे, ज्याचे एकूण भाडे 24.38 कोटी रुपये आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, भाडेतत्त्वावरील जागेत दोन तळमजल्यावरील युनिट्स आहेत, ज्यांचे एकत्रित कार्पेट क्षेत्रफळ 18,000 चौरस फूट पेक्षा जास्त आहे आणि एकूण आकारणीयोग्य क्षेत्रफळ 24,000 चौरस फूट पेक्षा जास्त आहे. पहिल्या वर्षाचे सुरुवातीचे मासिक भाडे 37.53 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आणि भाडेपट्ट्यात 5 टक्के वार्षिक वाढीचा कलम समाविष्ट आहे.
भाड्याव्यतिरिक्त, टेस्ला संपूर्ण भाडेपट्टा कालावधीत कॉमन एरिया देखभाल शुल्कासाठी, 1.62 कोटी रुपये देण्यास जबाबदार आहे आणि 2.25 कोटी रुपयांची सुरक्षा ठेव भरली आहे. भाडेपट्टा कराराची औपचारिक नोंदणी 16 मे 2025 रोजी झाली. परवाना कालावधी 20 एप्रिलपासून सुरू होतो, तर आकारण्यायोग्य भाडे कालावधी 1 जूनपासून सुरू होतो. या भाडेपट्ट्यामध्ये संपूर्ण पाच वर्षांचा लॉक-इन क्लॉज आहे, जो 19 एप्रिल 2030 पर्यंत वाढवला जाईल. या करारात 20 पार्किंग स्पॉट्सची सुविधा देखील समाविष्ट आहे. (हेही वाचा: Rent-a-Bike Policy: नागरिक व पर्यटकांना दिलासा! महाराष्ट्र सरकारने रेंट-अ-बाईक योजनेवरील 9 वर्षांची बंदी उठवली; आणले जाणार नवीन नियम)
सीआरई मॅट्रिक्सचे सीईओ अभिषेक किरण गुप्ता यांनी या विकासावर भाष्य केले आणि म्हटले की, टेस्लाचा भारतातील प्रवेश, हा पुण्यातील कार्यालय, बीकेसी आणि दिल्ली-एनसीआरमधील प्रमुख शोरूम, बीकेसीमध्ये को-वर्किंग उपस्थिती आणि आता कुर्ला पश्चिम, मुंबई येथे एक धोरणात्मक गोदाम सुविधा अशा जाणीवपूर्वक, बहु-शहरांच्या रोलआउटद्वारे आकार घेत आहे. गोदामाचा हा करार, टेस्लाच्या भारतात एक मजबूत इलेक्ट्रिक वाहन (EV) इकोसिस्टम स्थापित करण्याच्या हेतूचे संकेत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2025 09:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

