Tata Tiago Price Hike: टाटा टियागो 20 हजार रुपयांनी महागली, बेस व्हेरिएंटमध्ये 5 हजारांची वाढ; घ्या जाणून

सध्या, Tiago 11 पेट्रोल मॉडेल्स आणि 7 CNG व्हेरीएंटमध्ये उपलब्ध आहे. या सर्व व्हेरीएंटची किंमत 5,000 ते 20,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. Tata Motors ने 2016 मध्ये पहिल्यांदा Tiago कार भारतात लाँच केली होती.

Tata Tiago NRG Facelift (Photo Credits: Tata Motors)

देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) ने आपली छोटी कार टियागोच्या (TiagoTata ) किमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. सध्या, Tiago 11 पेट्रोल मॉडेल्स आणि 7 CNG व्हेरीएंटमध्ये उपलब्ध आहे. या सर्व व्हेरीएंटची किंमत 5,000 ते 20,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. Tata Motors ने 2016 मध्ये पहिल्यांदा Tiago कार भारतात लाँच केली होती. Tata Motors ने Tiago लाँच तेव्हापासून तिची रचना, आकार आणि उत्तम इंजिन आदी कारणांमुळे लोकांनी ती खरेदी करण्यात अधिक रस दाखवला. टियागोमध्ये काळानुसार अनेक बदल झाले आहेत. टियागोची थेट स्पर्धा मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) सारख्या गाड्यांशी आहे.

वाढत्या किमती आणि बदलते फिचर्स

Tata Tiago मध्ये 1199cc 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. जे 84.48 hp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देखील देते. हे 3-सिलेंडर इंजिन उत्तम मायलेजसह पिकअपच्या बाबतीतही चांगले आहे. (हेही वाचा, Cheapest Electric Car: भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च; पूर्ण चार्ज केल्यावर धावेल 200 किमी, जाणून घ्या किंमत)

नवी टाटा टीयागो AMT (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) प्राणालीयुक्त असल्याने ही कार गर्दीच्या ठिकाणी चालवणे सोपे जाते. सुरक्षिततेसाठी, यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) यांसारखी कारची वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, Tata Tiago iCNG मध्ये 1.2-लीटर रेवोट्रॉन इंजिन दिलेले आहे. ही कार 26.49 किमी/किलो मायलेज देते. पेट्रोल मोडमध्ये असताना ही कार 20kmpl मायलेज देते. आधी Tiago ची किंमत 5,39,900 रुपयांपासून सुरू होती, तर आता त्याची किंमत 5,44,900 लाख रुपयांपासून सुरू होत आहे.