पेट्रोलशिवाय चक्क 300 किलोमीटर धावणारी Tata Nexon इलेक्ट्रिक SUV कार लवकरच होणार लॉन्च

दरम्यान, कंपनीने या आधीच कारचा टीजर व्हिडिओ लॉन्च केला आहे. ज्यात मिलिंद सोमन आणि अंकिता कंवर मनाली-लेह आयवेवर टाटा नेक्सन इलेक्ट्रिक कार चालवाताना दिसत आहे.

Tata Nexon | (Images for symbolic purposes only । Photo Credits: tatamotors.com)

Tata Nexon इलेक्ट्रिक SUV कार सध्या भलतीच चर्चेत आहे. ही कार लवकरच लॉन्च होणार आहे. सांगितले जात आहे की, ही कार पुर्णपणे इलेक्ट्रिक आहे. ही कार एक वेळ चार्जिंग केली की 300 किलोमीटर चालते असा दावा करण्यात येत आहे. इलेक्ट्रिक कार वापरु इच्छिणाऱ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे. Tata Motors ने आपली पहिली Sub-Compact Electric SUV (सब-कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूवी) कार 19 डिसेंबरला मार्केटमध्य लॉन्च करत आहे. टाटा मोटर्स आपली पॉप्युलर सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूवी टाटा नेक्सन चे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करत आहे.

कार लॉन्च पूर्वी या कारचे फीचर्स आणि स्पेशिफिकेशन्स लीक झाली आहेत. दरम्यान, कंपनीने या आधीच कारचा टीजर व्हिडिओ लॉन्च केला आहे. ज्यात मिलिंद सोमन आणि अंकिता कंवर मनाली-लेह आयवेवर टाटा नेक्सन इलेक्ट्रिक कार चालवाताना दिसत आहे. टाटा मोटर्सने आपल्या इलेक्ट्रिक कारमध्ये जिपट्रॉन ईवी टेक्नॉलॉजी दीली आहे. ही टेक्नॉलॉजी कार चालवताना परफॉरमन्स, कंफर्ट आणि अफोर्डेबिलिटीची अनुभूती देईन. नेक्सनची जिपट्रॉन टेक्नोलॉजीला अल्ट्रोज ईवी आणि टिगोर ईवी मध्येही लॉन्च केले जाईल.

Tata Nexon | (Images for symbolic purposes only । Photo Credits: tatamotors.com)

लिक झालेल्या माहितीचा हवाला देत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, नेक्सॉन इलेक्ट्रिकमध्ये बॅटरी पॅक - 28.8kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीने लीथियम-आयन बॅटरी बॅक दिला आहे. ज्यामुळे खासकरुन भारतीय रस्ते आणि वातावरण विचारात घेऊन टेस्ट करण्यात आला आहे. या बॅटरी पॅकला IP67 रेटिंग मिळाला आहे. ज्यावर पाणी, धूळ यांचा काहीही परिणाम होणार नाही. बॅटरी पॅकला लिक्विड कूलिंग फीचर मिळेल, जेणेकरुन उष्ण तापमानमध्ये उत्कृष्ट कामगिरी करु शकेन. (हेही वाचा, Tata Motors कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! Economic Slowdown असला तरी नोकरी सुरक्षीत)

Tata Nexon | (Images for symbolic purposes only । Photo Credits: tatamotors.com)

नेक्सॉन इलेक्ट्रिक मध्ये 95kW ची मोटार आहे. जी 254Nm का टॉर्क निर्माण करते. या इलेक्ट्रिक मोटर चे पावर आउटपुट सुमारे 129HP आहे. नेक्सॉन एसयूवी फुल चार्जिंग केल्यावर 300 किमी इतके आंतर कापू शकते. लॉन्चिंगपूर्वी टाटा मोटर्सने चार्जिक इन्फ्रास्ट्रक्चरवर काम केले आहे.

Tata Nexon | (Images for symbolic purposes only । Photo Credits: tatamotors.com)

दरम्यान, 13 शहरांमध्ये 85 चार्ज आहेत. ज्यात टाटा मोटर्सने वाढ करुन 300 करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. ाय शहरांमध्ये पाच मेट्रो शहर मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरु आणि हैदराबादचा समावेश आहे. याशिवाय विशेष म्हणजे नेक्सन ईवीची चार्जिंगसाठी अनेक तास वाट पाहण्याची आवश्यकताना नाही. या कारचा चार्जर 60 मिनिटांमध्ये 80 टक्के चार्जिंग करु शकतो.