Tata Motors दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर, केवळ 799 रुपयांचा हफ्ता भरून करा कार खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न, वाचा सविस्तर
ग्रॅज्युअल स्टेप अप स्किम आणि टीएमम फ्लेक्सी ड्राईव्ह. या ऑफरनुसार ग्राहकांना 799 रुपयांच्या ईएमआयवर कार खरेदी करता येणार आहे. हा ईएमआय टाटा मोटर्सच्या कारच्या वेरियंटवर अवलंबून आहे.
आपल्या ग्राहकांना उत्तम आणि सुखसोयी असलेले आयुष्य देण्यासाठी त्यांचे कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनी नवनवीन योजना आणत असते. दिवाळी (Diwali Offer) अगदी तोंडावर आलेली असताना कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी टाटा मोटर्सने जबरदस्त ऑफर आणली आहे. यात केवळ 799 रुपयांचा EMI भरून तुम्ही नवी कार खरेदी करु शकता. यासाठी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे यासाठी टाटा मोटर्सने HDFC बँकेशी करार केला आहे. कमीतकमी ईएमआय भरून कार खरेदी करता येणार असल्याने ग्राहकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
टाटा मोटर्सने HDFC शी करार करुन यात दोन योजना दिल्या आहेत. ग्रॅज्युअल स्टेप अप स्किम आणि टीएमम फ्लेक्सी ड्राईव्ह. या ऑफरनुसार ग्राहकांना 799 रुपयांच्या ईएमआयवर कार खरेदी करता येणार आहे. हा ईएमआय टाटा मोटर्सच्या कारच्या वेरियंटवर अवलंबून आहे. हेदेखील वाचा- Tata Motors कंपनी नागरिकांना भाड्याने देणार 15 लाखांची कार, 36 महिने चालवून झाल्यानंतर पुन्हा परत द्यावी लागणार
या योजनेत पुढील 2 वर्षात हळूहळू EMI वाढत जाईल. मात्र ही वाढ ग्राहकांच्या सोयीनुसार असल्याने ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. त्यामुळे ग्राहकांवर कोणतेही आर्थक समस्या उद्भवणार नाही.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे ऑटोमोबाईल कंपनीच्या प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे अनेकांनी कार खरेदी करण्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे आपलेला गेलेला ग्राहकवर्ग परत मिळवण्यासाठी टाटा मोटर्सने ही योजना आणली आहे. ग्राहकांनी कार खरेदी करणे सुलभ व्हावे हा यामागचा उद्देश असल्याचे टाटा मोटर्स कंपनीचे म्हणणे आहे.
दरम्यान टाटा मोटर्स अलीकडे आपली 15 लाखांची कार भाड्याने देण्याची नवी योजना देखील आणली होती. जर ग्राहकाला 18 महिन्यांसाठी टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कार भाड्याने घ्यायची असल्यास त्याला प्रत्येक महिन्याला 47,900 रुपये मात्र मोजावे लागणार आहेत. 24 महिन्यांच्या सब्सक्रिप्शन प्लॅनमध्ये 44,900 रुपये तर 36 महिन्यांच्या प्लॅनसाठी 41,900 रुपये भाडे द्यावे लागणार आहे.