Revolt RV400 ई-बाईक ची बुकिंग आजपासून सुरु; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
रिव्हॉल्ट मोटर्सने आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक बाईक, RV400 साठी भारतात पुन्हा बुकिंग सुरु केली आहे. कंपनीने ई-बाईकसाठी भारतात बुकिंग सुरु करण्याची ही तिसरी वेळ आहे.
रिव्हॉल्ट मोटर्सने (Revolt Motors) आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike) RV400 साठी भारतात पुन्हा बुकिंग सुरु केली आहे. कंपनीने ई-बाईकसाठी भारतात बुकिंग सुरु करण्याची ही तिसरी वेळ आहे आणि देशभरातील 70 शहरांतील खरेदीदार बाईक बुक करू शकतात. रिव्हॉल्टचे केंद्र सध्या मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई आणि बेंगळुरू येथे उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त, 2022 पर्यंत जयपूर, सुरत, लखनौ, कोलकाता आणि चंदीगडसह आणखी 63 शहरांमध्ये सेंटर्स वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे.
रिव्हॉल्ट RV400 ची एक्स-शोरूम किंमत 1.25 लाख रुपये आहे. ही ई-बाईक Rebel Red, Mist Grey आणि Cosmic Black या तीन रंगामध्ये उपलब्ध आहे. जर तुमच्या राज्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी इंसेन्टीव्ह मिळत असेल तर बाईकची किंमत आणखी कमी होऊ शकते. महाराष्ट्रात सध्या रिव्हॉल्ट RV400 वर 16,000 रुपयांचे इंसेन्टीव्ह मिळत आहे, त्यामुळे ही बाईक तुम्ही 1.09 लाख रुपयांना विकत घेऊ शकतात. (हे ही वाचा: Tata Punch Micro-SUV Launched in India: मायक्रो एसयूव्ही टाटा पंच भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि इतर माहिती)
रिव्हॉल्ट RV400 कशी बुक कराल?
# रिव्हॉल्टच्या बुकिंग पेजवर जा.
# त्यानंतर आपले नाव, फोन नंबर, ईमेल, राज्य आणि शहर ही माहिती भरा.
# आपण खरेदी करू इच्छित असलेला रंग प्रकार निवडा आणि "Select" वर क्लिक करा.
# त्यानंतर तुम्हाला तुमच्या शहरावर अवलंबून डिलिव्हरी स्लॉट दाखवला जाईल.
# "Next" वर क्लिक करा.
# त्यानंतर पेमेंट बटणावर क्लिक करा.
# बुकिंग करताना फक्त 19,999 रुपयांचे पेमेंट करा.
# एकदा आपण पूर्ण केल्यावर, आपल्याला रिव्हॉल्टकडून पुष्टीकरण मिळेल आणि आपण आपल्या बुकिंगबद्दल अपडेट्स मिळायला सुरवात होईल.
रिव्हॉल्ट RV400 ही ई-बाईकमध्ये 3Kw ची इलेक्ट्रिक मोटर आणि 3.24KWh ची लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. बाईक 4.5 तासात पूर्ण चार्ज होऊ शकते. ई-बाईक 80 किमी प्रति तास आणि जास्तीत जास्त 150 किमीची वेग प्रदान करते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)