पॅडल न मारताही तब्बल 65 km चालते ही सायकल; कुलूप नव्हे, पासवर्ड टाकल्यावर होते लॉक-अनलॉक
ज्यामुळे या सायकलचा वेग 45 kmph (प्रति तास) इतका वाढतो. कंपनीने दावा केला आहे की, रिमूवेबल लिथियम आयर्न बँटरी एक वेळा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही सायकाल 65 किलोमीटर पेक्षाही अधिक मायलेज देते. पण, या सायकलची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी किमान 4 ते 5 तास इतका कालवधी लागतो.
व्यायामासाठी सायकल चालवणं हा विचार बाजूला ठेऊन तुम्ही जर सायकल चालवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. इलेक्ट्रिक बाइक निर्माता कंपनी Tempus ने नुकतीच आपली लेटेस्ट इलेक्ट्रिक बाइक Titan R लॉन्च केली आहे. ही सायकल पाहून इलेक्ट्रिक पेक्षा अधिक फील हा मोटरसायकल चालवल्याचाच येतो. दरम्यान, कंपनीचे म्हणने असे की, घराजवळ ऑफिस असणाऱ्या लोकांसाठी ही अगदी परफेक्ट बाईक आहे. या सायकलवरुन फिरण्यासोबत ऑफरोडिंग सुद्धा करता येते.
या सायकलच्या फिचरबाबत बोलायचे तर, Titan R मध्ये ओल्ड एज टेस्टेड मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. तसेच, सायकलच्या फ्रेमला एयरक्राफ्ट ग्रेड स्टीलपासून बनविण्यात आले आहे. सायकलच्या स्लिम स्ट्रक्चरमध्ये गॅस टँक यासारखा दिसणारा टँकही लावण्यात आला आहे. सोबत लेदरची सीटही देण्यात आली आहे. याशिवाय कंपनीने या सायकलच्या पुढच्या बाजूला दोन मोठे LED लाईटही दिले आहेत. तर, रिअरमध्ये दोन छोटी-छोटी टेललाइट लावली आहे.
दिसायला क्लासिक कॅफे रेसर सारखी असलेल्या या ई-बाईकमध्ये पासवर्ड प्रोटेक्शन इग्निशन सिस्टम देण्यात आली आहे. ज्यामुळे ही सायकल चोरी होण्याचा धोका अगदीच कमी होतो. याशिवाय सायकलला कलर LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो टाइम, स्पीड, रेंज आणि बॅटरी परसेंटेज आदीची माहिती देतो. (हेही वाचा, BattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत)
Tempus ने आपल्या Titan R मध्ये 1000W ची मोटर लावली आहे. ज्यामुळे या सायकलचा वेग 45 kmph (प्रति तास) इतका वाढतो. कंपनीने दावा केला आहे की, रिमूवेबल लिथियम आयर्न बँटरी एक वेळा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही सायकाल 65 किलोमीटर पेक्षाही अधिक मायलेज देते. पण, या सायकलची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी किमान 4 ते 5 तास इतका कालवधी लागतो.