Renault ने दक्षिण आफ्रिकेत लाँच केली 'मेड-इन-इंडिया' Triber कार; चेन्नईमधून 600 गाड्या एक्सपोर्ट

त्याच वेळी, कंपनी आता त्याच्या ऑटोमॅटिक आवृत्तीवर काम करीत आहे,

Renault Triber (Photo Credits: Twitter)

फ्रेंच वाहन निर्माता कंपनी रेनॉल्टने (Renault) गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, ट्रायबर (Triber) लाँच केले, तेव्हापासून आजपर्यंत कारने 30,000 पेक्षा जास्त युनिट विकल्या आहेत. त्याच वेळी, कंपनी आता त्याच्या ऑटोमॅटिक आवृत्तीवर काम करीत आहे, जी चाचणी दरम्यान बर्‍याचदा स्पॉट देखील झाली आहे. दरम्यान, आता बातमी येत आहे की, कंपनीने नुकतीच दक्षिण आफ्रिकेत 'मेड इन इंडिया' (Made in India) ट्रायबर सादर केली आहे.

याबाबत बोलताना, रेनॉल्ट इंडिया ऑपरेशन्स मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एमडी व्यंकटाराम ममिलापल्ले यांनी पीटीआयला सांगितले की, 'कंपनीच्या चेन्नई प्रकल्पातून ट्रायबरची मालवाहतूक यापूर्वीच सुरू झाली आहे आणि सुमारे 600 युनिट्स तिथे पोहचविण्यात आल्या आहेत.' ते पुढे म्हणाले की, 'ज्याप्रमाणे क्विड (Kwid) यशस्वी गाड्यांपैकी एक आहे, त्याचप्रमाणे आमचीही आशा आहे की ट्रायबर ग्राहकांना प्रचंड आवडेल.'

ते पुढे म्हणाले, 'दक्षिण आफ्रिकेcहे रस्ते पाहता आम्हाला आशा आहे की, ट्रायबर इथे चांगली कामगिरी करेल. आम्ही येथे दरमहा 300 युनिट्स विकू शकू.' कंपनी आपली एएमटी (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रांसमिशन) आवृत्ती आणणार आहे. ट्रायबरची किंमत दक्षिण आफ्रिकेत 1,64,900 रँड असेल. गेल्या वर्षी कंपनीने चेन्नई प्रकल्पातून सुमारे 13,000 युनिट्स पाठवले होते. चेन्नई येथील प्लांटची क्षमता वर्षाकाठी 8.8 लाख युनिट आहे. (हेही वाचा: ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला Corona Virus चा विळखा; बंद पडली जगातील सर्वात मोठी कार निर्माण कंपनी, 25 हजार कामगार सक्तीच्या रजेवर)

कंपनीने नुकत्याच संपलेल्या 2020 ऑटो एक्सपोमध्ये, ट्रायबर एएमटी सादर केले. ज्यामध्ये, विद्यमान मॉडेलप्रमाणेच, 1.0-लिटर क्षमतेचे 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन वापरले जाऊ शकते. जे 72hp ची पॉवर आणि 96Nm चा टॉर्क जनरेट करेल. याशिवाय 5 स्पीड एएमटीचा पर्यायही यात देण्यात येणार आहे. वैशिष्ठ्यांबद्दल बोलायचे झाले तर, रेनॉल्टने ट्रायबरमध्ये 8 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कीलेस एन्ट्री, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, एसी व्हेंट्ससह 7-सीट मॉड्यूलर आसन मांडणी आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी समाविष्ट केली आहे.