Maurti Cars 1 जानेवारीपासून महागणार; 'या' कार्सच्या किंमती वाढणार
नववर्षात Maruti च्या गाड्या खरेदी करण्याचा विचार करत असला तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.
नववर्षात Maruti च्या गाड्या खरेदी करण्याचा विचार करत असला तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 2019 मध्ये मारुतीच्या गाड्यांची किंमत वाढणार आहे. 1 जानेवारी 2019 पासून कार्सच्या किंमतीत वाढ होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
डिसेंबर महिन्यात मारुतीच्या गाड्यांवर डिस्काऊंट आणि एक्सचेंज ऑफर मिळत आहे. मात्र नववर्षापासून गाड्यांच्या किंमतीत वाढ करण्यात येणार आहे. कारच्या इनपूटचा वाढता खर्च आणि विदेशी चलनाची अस्थिरता यामुळे कार्सच्या किंमतीत वाढ करण्यात येणार आहे. मात्र ही वाढ नेमकी किती असेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. इन्ट्री लेव्हल हॅचबॅक Alto 800 ते स-क्रॉस प्रीमियम क्रॉसओव्हरपर्यंत या गाड्यांच्या किंमतीत वाढ होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. इतकंच नाही तर Ciaz आणि Ertiga यांसारख्या नवीन गाड्या देखील महागणार आहेत. Isuzu च्या गाड्या नववर्षापासून महागणार; लाखभराने वाढणार किंमती
मारुतीच नाही तर इतर कार कंपन्यांनी गाड्यांच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. जानेवारी 2019 पासून बीएमडब्ल्यू (BMW) च्या गाड्या देखील महागणार आहेत. याशिवाय फोर्ड इंडियाने देखील गाड्यांच्या किंमती 1-3% नी वाढवल्या आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने देखील गाड्यांच्या किंमती नववर्षापासून वाढविणार असल्याचे सांगतिले होते.