Ola Electric भारतात पुढच्या वर्षात लॉन्च करणार इलेक्ट्रिक टू-व्हिलर

दिग्गज खासगी कॅबची सर्विस देणारी ओला (OLA) आता इलेक्ट्रिक टू व्हिलर (Electric Two Wheeler) मार्केटमध्ये आणण्याचा तयारीत आहे. यांची सहाय्यक कंपनी Ola Electric भारतात आणि ग्लोबल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करणार आहे.

OLA Electric (Photo Credits-Twitter)

दिग्गज खासगी कॅबची सर्विस देणारी ओला (OLA) आता इलेक्ट्रिक टू व्हिलर (Electric Two Wheeler)  मार्केटमध्ये आणण्याचा तयारीत आहे. यांची सहाय्यक कंपनी Ola Electric भारतात आणि ग्लोबल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करणार आहे. यासाठी ओला इलेक्ट्रिकने नेदरलँडची इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी Etergo BV चे अधिग्रहण केले आहे. ओला इलेक्ट्रिक पुढील वर्षात (2021) मध्ये त्यांची टू-व्हिलर भारतीय बाजारात उतरवणार आहेत.

नेदरलँडमधील इलेक्ट्रिक कंपनी Etergo ची स्थापना 2014 मध्ये झाली होती. ही कंपनी AppScooter साठी प्रसिद्ध आहे. या स्कूटरने इनोव्हेटिव्ह डिझाइन आणि इंजिनिअरिंगसाठी जभरातील खुप पुरस्कार मिळवले आहेत. यामध्ये CES 2019 चे काही अवॉर्ड आणि जर्मनीचे ऑटोमोटिव ब्रँन्ड कॉन्टेस्ट अवॉर्ड यांचा सहभाग आहे.(Own-Online: लॉक डाऊनमध्ये घर बसल्या ऑनलाईन विकत घेऊ शकणार महिंद्रा अँड महिंद्राच्या गाड्या; कंपनीने सादर केला Online platform)

Etergo AppScooter पहिल्यांदा 2018 मध्ये सादर करण्यात आली होती. ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्जिंग केल्यावर 240 किमी पर्यंत चालते. यामध्ये हायएनर्जी डेंसिटी बॅटरी देण्यात आली असून ती स्वॅप केली जाऊ शकते. कंपनीने असा दावा केला आहे की, अॅपस्कूटर 3.9 सेकंदात 0 ते 45 किमी प्रति तास वेग पकडण्याची त्यामध्ये क्षमता आहे. अॅपस्कूटरमध्ये TFT Instrument कंसोल दिला आहे. स्कूटरच्या सीट खाली 50 लीटर स्टोरेजची क्षमता आहे.

ओला इलेक्ट्रिकचे फाउंडर आणि चेअरमॅन भावेश अग्रवाल यांनी असे म्हटले आहे की, मोबिलिटीचे भविष्य इलेक्ट्रिक आहे आणि COVID19 नंतर जग आमच्यासाठी जागतिक स्तरावर इलेक्ट्रिकचा अधिकाधिक उपयोग केला जाईल. प्रत्येक वर्षात जगभरात चारचाकी गाड्यांच्या तुलनेत दुप्पट टू-व्हिलर्सची विक्री करण्यात येते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now