Mukesh Ambani यांनी खरेदी केली 13 कोटींची नवीन Rolls Royce SUV; व्हीआयपी नंबरसाठी खर्च केले 'एवढे' रुपये
RTO अधिकार्यांनी सांगितले की, कंपनीने 12-सिलेंडर कारसाठी 'टस्कन सन' रंगाची निवड केली आहे जी 2.5 टन पेक्षा जास्त वजनाची आणि 564 bhp पॉवर निर्माण करते. या आलिशान कारसाठी खास नंबर प्लेटही घेण्यात आली होती.

Mukesh Ambani यांनी खरेदी केली 13 कोटींची नवीन Rolls Royce SUV
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी नवीन रोल्स रॉयस एसयूव्ही (Rolls Royce SUV) कार खरेदी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारची किंमत 13 कोटी 14 लाख रुपये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे मालक मुकेश अंबानी यांनी खरेदी केलेली अल्ट्रा लक्झरी रोल्स रॉयस एसयूव्ही (Ultra Luxury Rolls Royce SUV) कार यूकेच्या लक्झरी वाहन निर्माता रोल्स रॉयसने बनवली आहे. टस्कन सन (Tuscan Sun) कलरची ही आलिशान कार 12 सिलिंडरची असल्याचे सांगण्यात येत आहे. या लक्झरी कारचे वजन सुमारे 2.5 टन आहे. मुकेश अंबानी यांनी देशातील सर्वात महागडी कार खरेदी केली आहे.
आरटीओ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही आलिशान कार देशातील आतापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या सर्वात महागड्या कारपैकी एक आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या अधिका-यांनी सांगितले की, रोल्स रॉइस Cullinan पेट्रोल मॉडेल कारची नोंदणी रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) द्वारे 31 जानेवारी रोजी दक्षिण मुंबईतील तारदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात केली होती. 2018 मध्ये पहिल्यांदा लॉन्च झाल्यानंतर त्याची मूळ किंमत 6.95 कोटी होती. ऑटो इंडस्ट्रीतील तज्ज्ञांच्या मते, या कारमध्ये बदल करण्यात आला होता, त्यानंतर तिची किंमत खूपच वाढली होती. आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंबानींनी विकत घेतलेली Cullinan SUV ही देशातील सर्वात महागड्या कारपैकी एक आहे. (वाचा - Ola Electric Car: ओला लॉन्च करणार इलेक्ट्रिक कार; 'अशी' आहे Concept Design, जाणून घ्या सविस्तर)
व्हीआयपी नंबरसाठी खर्च केले 12 लाख रुपये -
RTO अधिकार्यांनी सांगितले की, कंपनीने 12-सिलेंडर कारसाठी 'टस्कन सन' रंगाची निवड केली आहे जी 2.5 टन पेक्षा जास्त वजनाची आणि 564 bhp पॉवर निर्माण करते. या आलिशान कारसाठी खास नंबर प्लेटही घेण्यात आली होती. आरटीओ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या कारची नोंदणी 30 जानेवारी 2037 पर्यंत वैध आहे. RIL ने कारसाठी एकरकमी 20 लाख दिले. याशिवाय नवीन आलिशान कारसाठी व्हीआयपी क्रमांक मिळविण्यासाठी 12 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)